मराठी साहित्य – मराठी कविता – ♥ प्रेमवेडा पाऊस ♥ – सौ .योगिता किरण पाखले
सौ .योगिता किरण पाखले
(आदरणीया सौ .योगिता किरण पाखले जी का e-abhivyakti में हार्दिक स्वागत है। सौ.योगिता जी मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। आप कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपकी रचनाएँ स्तरीय पत्र पत्रिकाओं / चैनलों में प्रकाशित/प्रसारित हुई हैं। आज प्रस्तुत है आपकी वर्षा ऋतु पर आधारित शृंगारिक कविता “प्रेमवेड़ा पाऊस”। हम भविष्य में आपकी और चुनिन्दा रचनाओं को प्रकाशित करने की अपेक्षा करते हैं।)
♥ प्रेमवेडा पाऊस ♥
आठवतो मला आजही तो पाऊस
आपल्या प्रेमाची पूरवायचा हौस …… धृ
सरीवर सरी किती धुंद करायच्या
भावनांच्या ओलाव्यात चिंब चिंब भिजवायच्या
डोळ्यांनीच सांगून जायचा,नको ना गं जाऊस
आठवतो मला….. १
ओथंबलेले घन अन भिजले मन थांबवायचे कसे
काही शब्दातच सारे गाणे बसवायचे कसे
माहित होत त्याला म्हणूनच सांगायचा, नको ना गं गाऊस
आठवतो मला….. २
कधी खोडकर कधी हळवा होऊन बरसायचा
डोळ्यातील अश्रूंना उगाचच पावसात भिजवायचा
मी बोलायच्या आतच म्हणायचा, नको ना गं पाहूस
आठवतो मला……. ३
भर पावसात मुद्दामच छत्री विसरायचा
एका छत्रीत( छताखाली) येण्याचा बहाणा शोधायचा
मी बोलण्या आधीच कटू सत्य म्हणायचा, नको ना गं दृष्ट लावूस
आठवतो मला….. ४
© सौ. योगिता किरण पाखले, पुणे