मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ पर्यावरण – केल्याने होत आहे रे ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

२३जुलै वनसंवर्धन दिन विशेष

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है।  इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। आज प्रस्तुत है  23 जुलाई  वनसंवर्धन दिवस पर विशेष आलेख “ पर्यावरण – केल्याने होत आहे रे । इस विशेष आलेख के लिए श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी  का विशेष आभार ) 

 

☆ पर्यावरण – केल्याने होत आहे रे ☆

 

सध्या सगळीकडे छान पाऊस पडल्याने वातावरण कसं धुंद झालंय.आणि वृक्षारोपणाचं महत्त्व पटलेल्या आपणा सर्वांनाच कधी एकदा झाडं लावतोय असं झालं असेल नां ? अगदी मलासुद्धा !

झाडं लावणं ती जगवणं हे तर पर्यावरणच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे व काळाची गरज आहे, त्यामुळे निसर्ग प्रेमी , शाळा महाविद्यालयातली मुलं , विविध सामाजिक संस्था , कंपन्या वृक्षारोपणासाठी अगदी हिरिरीने पुढं येतील.

झाडं ही पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर आहेत.कारण आज आपल्याला श्र्वास घेणं ही अवघड होऊ लागलंय.! कारण हवेतल्या आॅक्सीजनच प्रमाण घटत चाललंय अन् ते फक्त झाडं आणि झाडांचं भरुन काढू शकतात.आपण कितीही पैसे दिले तरी आॅक्सीजन विकत घेऊ शकत नाही.

पण! हा पण शब्द फार महत्त्वाचा आहे.नुकताच एक व्हीडिओ व्हायरल झालाय,त्यात सांगितलंय की निसर्गातल्या मनुष्य प्राण्यांसाठी योग्य अशीच झाडं लावणं आवश्यक आहे.

त्यासाठी पुण्याच्या Holistic  Environment Activities & Learning Foundation, Pune (www.healngo.com now non-functional.  For more information you may contact their facebook page – https://www.facebook.com/healngopune/?rc=p)

यांनी व्हीडीओ पाठवलाय.त्यात त्यांनी म्हटलंय, कोल्हापूर जवळच एक गाव उंदीर व सापांनी व्यापून गेलं. घरात साप , बाहेर साप, विषारी,बिन विषारी.या गावात एवढे साप कां यावेत, याबाबत संशोधन केले तेव्हा समजलं की तिथं चुकीचं वृक्षारोपण करण्यात आले होते.

“गिरीपुष्प “अर्थात उंदीर मारी ही झाडं गावाच्या आसपास खूप मोठ्या प्रमाणात लावण्यात आली व ती पटापट वाढली.

ह्या झाडांची फुलें प्राण्यांसाठी विषारी असतात,

त्यामुळे झाडाच्या आसपासचे उंदीर गावात घुसले व त्यामागे साप.

ही झाडं लावताना कुणालाही एवढा घातक परिणाम होईल याची कल्पना ही नव्हती.

वृक्षारोपण करताना ते कोणत्या प्रदेशात म्हणजे माळरान कि, पठार किंवा टेकडी , तसेच त्या प्रदेशात पाऊस किती पडतो, कुठल्या प्रकारची वनस्पती तेथे जगू शकेल हे पहायचं महत्त्वाचे आहे नुसती झाडं लावणं नाही असे या व्हीडीओत म्हटले आहे.त्यात असेही म्हटले आहे की, काळजीपूर्वक झाडं नि्वडली तरच प्राणी,पक्षी,कीटक व आपल्यालाही मदतीची ठरतात.

तरी शासनाच्या संबंधित विभागाने याबाबतच्या वस्तुस्थितीची सत्यासत्यता पडताळून पाहावी व त्यात तथ्य असल्यास वृक्षारोपणात सहभागी होणाऱ्यांना आवश्यक त्या सूचना तातडीने. द्याव्यात,असे मला वाटते.

तुम्हाला काय वाटते जरुर कळवा.

 

©®उर्मिला इंगळे, सातारा