सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 125
☆ गझल… ☆
तुझे स्वप्न जागेपणी खास आहे
जुना ध्यास या प्रेम पर्वास आहे
कधी शाम म्हणते कधी कृष्ण कान्हा
तुझे नाव माझा जणू श्वास आहे
फुलाला कसे काय नाकारते मी ?
अरे काळजाशी तुझा वास आहे
जरी मी न राधा नसे गोपिकाही
तरी रंगलेला इथे रास आहे
मला लाज लज्जा मुळी आज नाही
सुगंधी सुखाचाच सहवास आहे
कुण्या कारणाने अशी धीट झाले
तुझा संग साक्षात मधुमास आहे
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈