सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “आजी आणि नातवंडं…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

आजी आणि नातवंडं यांच्या नात्यावरची श्री संदीप खरे यांची सुंदर कविता आणि तिला दिलेलं उत्तर:

आजी म्हणते काढल्या खस्ता

जन्मभर मी केले कष्ट

तू म्हणजे त्या सगळ्याची

शेवट गोड असलेली गोष्ट

*

सगळं कथा पुराण झालं

देव काही दिसला नाही

कुशीत येतोस तेव्हा कळतं

कृष्ण काही वेगळा नाही… 

– श्री संदीप खरे

 

ह्या  कवितेला नातवाने दिलेले  उत्तर :

प्रश्न खूप पडतात ग, आज्जी,

देशील का मज उत्तरं त्यांची?

ठाऊक आहेत देवकी-यशोदा,

पण… आज्जी होती का कृष्णाची?

*

खाण्यासाठी चोरून माखन

उगाच करी सवंगड्यांसी गोळा?

खडीसाखरेवरती आज्जी

देई न त्या लोण्याचा गोळा?

*

बांधून ठेवी माय यशोदा

उखळासी करकच्चून त्याला,

धावूनी का ग गेली नाही

आज्जी त्याला सोडविण्याला?

*

कधी ऐकले, त्यास आजीने

दिला भरवुनी मऊ दूधभात?

निळ्या मुखावर का ना फिरला

सुरकुतलेला थरथरणारा हात?

*

असेल मोठ्ठा देव, तरी पण

आज्जी त्याला नव्हती नक्की,

म्हणूनी सांगतो मी सर्वांना …

कृष्णापेक्षा मीच लकी

*

कवी: अज्ञात

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments