वाचताना वेचलेले
☆ ताल थांबला .. तबला रडला .. कवी : श्री सुधीर विट्ठल मुळे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆
☆
ताल थांबला तबला रडला
कवी: श्री.सुधीर विठ्ठल मुळे
प्रस्तुती: सौ. स्मिता पंडित
*
ॐकारातून ध्वनी प्रकटले
अवघे ब्रह्मांड गजबजले
मृदुंग तबला ढोल वाजले
जणू शिवाने तांडव केले
*
तिरकीट धा तिरकीट धा
कडकडून वाजला तबला
अवघे श्रोते थरारून गेले
टाळ्यांचा कडकडाट झाला
*
उ. झाकीरभाई गोड हसले
रसिकांना अभिवादन केले
पुन्हा भेटण्याचे कबूल केले
सहज शांतपणे निघून गेले
*
आयुष्यभर तालात राहिले
तालासाठी सारे सोडले
ध्यास एक घेऊनी जगले
तालसुरांशी नाते जोडले
*
तालशास्त्र रोशन केले
तबल्याचे महत्त्व वाढवले
किती विद्यार्थी शिकवले
आयुष्याचे सार्थक केले
*
झाकीरभाई –
का जाण्याची घाई केली
श्रोतेगण सारे दु:खी झाले
तबला डग्गा पारखे झाले
सूर ताल सारे अवघडले
*
जगात इतुके नाव झाले
तरी पाय जमिनीवर राहिले
विनम्रभाव सदैव दिसले
हेच आम्हा शिकवून गेले
☆
कवी: श्री सुधीर विठ्ठल मुळे
प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈