? वाचताना वेचलेले ?

 ☆ जातीचं काय घेऊन बसलात राव ? – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती श्री संजय जोगळेकर ☆

अरे जात म्हणजे काय.. ? 

माहित तरी आहे का.. ?

 

अरे कपडे शिवणारा शिंपी.. !

तेल काढणारा तेली.. !

केस कापणारा न्हावी.. !

लाकुड़ तोडणारा सुतार.. !

दूध टाकणारा गवळी.. !

गावोगावी भटकणारा बंजारा.. ! 

भांडी बनविणारा कासार, दागिने बनविणारा सोनार, मूर्ती मातीची भांडी बनविणारा कुंभार,

रानात मेंढी-बकरी वळणारा धनगर.. !

पुजा-अर्चा, पौरोहित्य करणारा ब्राह्मण.. !

बूट चप्पल शिवणारा चांभार.. ! 

बागायती शेती करणारा 

वृक्ष लावणारा माळी. !

आणि लढाई लढणारा क्षत्रिय.. !

 

आलं का काही डोस्क्यात.. ?

आरं काम म्हणजे जात.

आणि सर्वात महत्त्वाचे वरील प्रमाणे कामे आता कुठल्याही जातीचीच व जातीसाठी राहिली नाहीत.

आता शिक्षणाने व्यवसाय प्रत्येकाचे बदलले आहेत.

आता भांडत बसण्यापेक्षा जाती बदला.

आता इंजीनीयर ही नवी जात.

कॉम्प्यूटर, केमिकल ही पोटजात.

“सी. ए” ही पण जात.

तर 

“एम. बी. ए” ही नवी जात.

डॉक्टर ही पण जात.

तर वकीलही जातच.

तर “शिक्षण” व “माणुसकी” हाच खरा धर्म.

 

बदला की राव कवाचं तेच धरुन बसलात.. !

घरीच दाढी करता नवं.. ? 

तेव्हा तुम्ही न्हावी होता.

बुटाला पालीश करता नव्हं.. ?

तेव्हा तुम्ही चांभार होता.

गैलरी टेरेस वर झाडे लावता ना.. !बगीचा करता तेव्हा तुम्ही माळी होता.

घरच्या घरीच पुजा-अर्चा करता नव्ह.. !तेव्हा ब्राम्हण होता.

आरं कामानं मोठं व्हा जातीनं न्हाय.. !

आरं तुम्ही ह्या जातीत जन्माला आला,

हा काय तुमचा पराक्रम हाय व्हय.. ?

मंग कशाला उगीचच बोंभाटा करता राव.. ?

तुम्ही शहरात/खेडेगावात राहत असाल तुम्ही आजारी पडल्यावर/अडीअडचणीला मदतीला सगळ्यात आधी धावून येतो तो तुमचा शेजारी/मित्र आणि तो तुमच्या वरीलप्रमाणे जुन्या जातीचा नसतोच हे मान्य कराल की नाही.. ?

 

सगळ्याला आता आधुनिक पद्धतीने काम हाय.. !

सगळ्याला शिक्षण खुले हाय.. !

खूप शिकायचं कामं करायचे.. ! 

माता पित्याचे-गावाचे-जिल्हय़ाचे-राज्याचे-देशाचे नाव लौकिक करायचे… !!

 

“जात फक्त राजकारणी लोकांनी स्वार्थासाठी जिवंत ठेवली आहे”

 ☆

लेखक : अज्ञात 

संग्राहक : संजय जोगळेकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments