श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “माणसाला शेपूट येईल का?” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

गाठभेट होऊन सुद्धा, अगदी बाजूला बसून सुद्धा किंवा Whatsapp चा मेसेज वाचून सुद्धा… हल्ली माणसं एकमेकाशी बोलत नाहीत. या गंभीर विषयावरची एक बोलकी कविता.

कवीचे खूप आभार आणि आपल्यासाठी साभार पोच 

माणसाने माणसाशी 

संवाद तोडला आहे

म्हणून तो घरा घरात 

एकटा पडला आहे 

*

येत्या काळात ही समस्या

अक्राळविक्राळ होईल 

तेंव्हा आपल्या हातातून

वेळ निघून जाईल 😃 

*

कदाचित माणूस विसरेल

संवाद साधण्याची कला

याच्यामुळे येऊ शकते

मूकं होण्याची बला 😃

*

पूर्वी माणसं एकमेकांना

भरभरून बोलायचे

पत्र सुद्धा लांबलचक

दोन चार पानं लिहायचे 😃

*

त्यामुळे माणसाचं मन

मोकळं व्हायचं

हसणं काय, रडणं काय

खळखळून यायचं

*

म्हणून तेंव्हा हार्ट मध्ये

ब्लॉकेज फारसे नव्हते

राग असो लोभ असो 

मोकळं मोकळं होतं 😃

*

पाहुणे रावळे गाठीभेटी

सतत चालू असायचं

त्याच्यामुळे प्रत्येक माणूस

टवटवीत दिसायचं 

*

आता मात्र माणसाच्या

भेटीच झाल्या कमी

चुकून भेट झालीच तर

आधी बोलायचं कुणी ? 😃

*

ओळख असते नातं असतं

पण बोलत नाहीत

काय झालंय कुणास ठाऊक

त्यांचं त्यांनाच माहीत 😃

*

घुम्यावणी बसून राहतो

करून पुंगट तोंड

दिसतो असा जसा काही

निवडुंगाचं बोंड 😜

*

Whatsapp वर प्रत्येकाचेच 

भरपूर ग्रुप असतात

बहुतांश सदस्य तर

नुसते येड्यावणी बघतात 😜

*

त्यांनी मेसेज वाचल्याच्या

दिसतात निळ्या खुणा

पण रिप्लायसाठी सुटत नाही

शब्दांचा पान्हा 

*

नवीन नवीन Whatsapp वर

चांगलं बोलत होते

दोनचार शब्द तरी 

Type करत होते 🤣

*

आता मात्र बऱ्याच गोष्टी

इमोजीवरच भागवतात 

कधी कधी तर्कटी करून

इमोजीनेच रागवतात 😡 😜

*

म्हणून इतर प्राण्यांसारखी

माणसं मुकी होतील का ?

भावना दाबून धरल्या म्हणून

माणसाला शिंग येतील का ? 🤪 

*

काय सांगावं नियती म्हणेल

लावा याला शेपटी

वाचा देऊन बोलत नाही

फारच दिसतो कपटी 😛

*

हसण्यावर नेऊ नका 

खरंच शेपूट येईल

पाठीत बुक्का मारून मग

कुणीही पिळून जाईल 😜

*

म्हणून म्हणतो बोलत चला

काय सोबत नेणार?

उगाच तुमची वाचा जाऊन

फुकट शेपूट येणार 😛 👆🌹🚩

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments