सौ अंजली दिलीप गोखले
वाचतांना वेचलेले
☆ आयुष्याचं ‘व्यवस्थापन’… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
☆
कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं
हे कळलं तर, आयुष्य ‘भावगीत’ आहे.
*
किती ताणायचं आणि कधी नमतं घ्यायचं
हे उमजलं तर आयुष्य ‘निसर्ग’ आहे.
*
किती आठवायचं आणि काय विसरायचं,
हे जाणलं तर आयुष्य ‘इंद्रधनूष्य’ आहे.
*
किती रुसायचं आणि केव्हा हसायचं…
हे ओळखलं तर आयुष्य ‘तारांगण’ आहे.
*
कसं सतर्क रहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं,
हे जाणवलं तर आयुष्य ‘नंदनवन’ आहे.
*
कुठे? कधी? किती? काय? केव्हा? कसं?
याचा समतोल साधता आला तर, आयुष्य खूप सुंदर आहे.
*
त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं,
अधिकार असूनही नम्र राहणं, राग असूनही शांत राहणं,
☆
– – – यालाच आयुष्याचं ‘व्यवस्थापन’ म्हणतात.
कवी : अज्ञात
संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈