सौ अंजली दिलीप गोखले
वाचतांना वेचलेले
☆ ‘एका ‘स्पेससम्राज्ञी‘ ची कैफियत…‘ – लेखक : श्री विनय गोखले ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
☆
कुणी पृथ्वी देता का पृथ्वी ?
कुणी पृथ्वी देता का पृथ्वी ?
एका गुरुत्वविरहिणीस कुणी पृथ्वी देता का ?
एक स्पेस-स्त्री
आकर्षणावाचून,
निसर्गावाचून,
माणसाच्या मायेवाचून,
देवाच्या दयेवाचून
अवकाशात गोलगोल भ्रमतेय.
जिथून पुन्हा पृथ्वीच्या कवेत जाता येईल
अशी एक कक्षा धुंडतेय.
कुणी पृथ्वी देता का पृथ्वी ?
ना कुणी सगेसोयरे,
ना मित्रमैत्रिणी,
एक स्पेस-स्त्री
गप्पागोष्टींवाचून,
हशाटाळ्यांवाचून,
उन्हपावसावाचून,
मुक्त श्वासांवाचून
मतीकुंठित झालीये.
पुन्हा एकदा
पृथ्वीतलावरील जीवनाच्या
महाकुंभमेळ्यात मिसळण्यास
आतुरलीये.
कुणी पृथ्वी देता का पृथ्वी ?
कुणी पृथ्वी देता का पृथ्वी ?
☆
कवी: श्री. विनय गोखले
संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈