वाचताना वेचलेले
☆ खुंट्याजवळचे दाणे ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆
कबाल– कबीराचा मुलगा. एकदा काशीतून फिरत असता त्याला एका घराचे दार उघडे दिसले. त्याने आत डोकावून पाहिले तर तिथे एक बाई दळण दळत होती.
कबाल खूप वेळ उभा राहून ते पाहात होता. दाणे जातात कुठे ???
त्याला रडू आले. त्याचा समज झाला की सर्व दाण्यांचे पीठ झाले व ते मेले.
त्याने विचार केला, ‘ आपणही या काळाच्या चक्कीत असेच पिसले जात आहोत.’
कबाल घरी आला, वडलांजवळ जाऊन रडू लागला—
कबीर महाराज विचारताहेत—-” कबाल अरे काय झाले रे ? “
कबाल सर्व पाहिलेलं सांगतो, आणि म्हणतो—” जात्यामध्ये सर्व दाणे मेले . “
कबीर कबालाला घेऊन त्या बाईच्या घरी गेले. जात्याची वरची पाळी बाजूला करुन दाखविली.
खुंट्याजवळ २ , ४ दाणे तसेच चिकटलेले होते—–
ज्या दाण्यांनी त्या खुंट्याचा आधार घेतला होता ते तसेच होते. कबालच्या भाषेत ‘ ते वाचले..’.
—-आपल्याही संसाराच्या जात्याला एक खुंटा आहे.–
तो म्हणजे “ सदगुरु.” —-
त्यांना धरुन ठेवावे —
त्यांचा आधार घ्यावा —
जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होते —
—- विनाशाची भिती टाळायची असेल तर अविनाशी खूंटा सदगुरु—
त्यांचा आधार घ्यावा—-
तो घट्ट धरुन ठेवावा —
—-जीवाला निर्भय करणारी एकच विभूति —-
“ती म्हणजे सदगुरु होय .”
संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈