श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ आता उतार….अनिल अवचट ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
आता उतार सुरू
किती छान
चढणे ही भानगड नाही
कुठलं शिखर जिंकायचं नाही
आता नुस्ता उतार
समोरचं झाडीनं गच्च भरलेलं दृश्य,
दरीतून अंगावर येणारा
आल्हाददायक वारा,
कधी धुकं, तर कधी ढगही..
टेकावं वाटलं तर टेकावं
एखाद्या दगडावर..
बसलेल्या छोट्या पक्ष्याशी
गप्पा माराव्यात,
सुरात सूर मिसळून…
अरे, हे सगळं इथंच होतं?
मग हे चढताना का नाही दिसलं?
पण असू दे
आता तर दिसतंय ना
मजेत बघत
उतरू हळूहळू
मस्त मस्त उतार
– श्री अनिल अवचट
प्रस्तुती श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈