सुश्री सुनिता गद्रे
वाचताना वेचलेले
☆ ती बाहेर जाता– लेखन सुश्री उन्नती गाडगीळ ☆ संग्रहिका – सुश्री सुनिता गद्रे ☆
🚶♂️स्त्री बाहेर जाते, तेव्हा घर,दार सुद्धा गदगदते. आडवते. विनवते..
🧜🏻♀️ ती बाहेर जाता–
ती बाहेर जाता..
उंबरा येतो आडवा..
करून स्वर रडवा..
धरतो ..चरण..
म्हणतो.. माझे ठेव स्मरण।।
ती बाहेर जाता..
कडकडाट करते कडी..
म्हणे.. मज घालून बेडी?
कुठे चालली तू वेडी??
ती बाहेर जाता…
दरवाजा येई पाठी..
जणू.. बाळ घट्ट मारे मिठी..
.. .धरून.. पदर…
म्हणे.. येई लवकर।।
.. ती बाहेर जाता..
रांगोळी हासे गालात..
म्हणे नको बसू कोंडून घरात
बाहेरचं येईल रंगत।
ती बाहेर जाता..
दारावरील गणेश आसनस्थ
म्हणे स्वत्व उजळं,कर्म कर स्वच्छ..
.तथास्तु।शुभं भवतु।
उन्नती गाडगीळ🌹🙏🏾
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈