वाचताना वेचलेले
☆ नव-यांचे प्रकार… ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆
😳😨नवऱ्यांचे प्रकार:
१) प्रेमळ 😄: ह्या ड्रेसमधे तू काय मस्त दिसतेस !
२) उदार 😎: तुला हवी ती साडी घे.
३) समजुतदार : तु आज खूपच दमलेली दिसतेस, चल आज बाहेर जेवायला जाऊ.
४) हौशी : तुझ्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणलाय बघ.
५) प्रामाणीक 😒: मित्राने खूप आग्रह केला, पण मी फक्त दोनच पेग घेतले. आणी सिगरेट तर अजिबात ओढलीच नाही. तुला शब्द दिलाय नां ?
६) एकनिष्ठ 😞 : अगं, ती माझी शाळेतली मैत्रीण. पण स्वभावाने एकदम खडूस, तुझ्यासारखी मनमिळावू नाही.
७) कष्टाळू 😟: ऑफिस मधून येताना भाजी घेऊनच आलो, उगाच तुला परत मंडईत जायचा त्रास नको.
८) आज्ञाधारक 🥺 : मित्र पार्टीला बोलवत होता, पण म्हटलं आधी तुला विचारावं आणी मगच कळवावं.
९) स्वाभिमानी ☹️ : मी काय तुझ्या शब्दाबाहेर आहे कां ?
१०) काटकसरी 😖: मोत्यांचा नेकलेस काय करायचाय? मण्यांची माळ घातलीस तरी चालेल. जातीच्या सुंदरीला काहीही शोभतं.
११) धाडसी 😗: तुझी आई आणखीन किती दिवस राहाणार आहे ?
१२) मितभाषी😇 : हो !
१३) खंबीर 😆: तु म्हणशील तसं, तू आणी मी काय वेगळे आहोत कां ?
१४) आर्जवी 😘: मी चहा करणारच आहे, तूही घे नां !
वरीलपैकी कोणत्याही कॅटेगरीत नवरा बसत नसल्यास……
आपलंच नशीब खोटं…
असं मानून गप्प बसावे…!
😷🙊
संग्राहक – सुश्री हेमा फाटक