वाचताना वेचलेले
☆ लक्झरी म्हणजे काय?… ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆
अमेरिकेतील सर्वात महागड्या हॉस्पिटलमधून उपचार घेता येणे म्हणजे लक्झरी नाही.
लक्झरी म्हणजे निरोगी असणे.
लक्झरी म्हणजे क्रूझवर जाणे असे नाही किंवा प्रसिद्ध शेफने तयार केलेले अन्न खाणे नव्हे.
लक्झरी म्हणजे आपल्या स्वतःच्या अंगणात किंवा परसात उगवलेल्या ताज्या सेंद्रिय भाज्या खाता येणे.
लक्झरी म्हणजे तुमच्या घरात लिफ्ट असणे असे नव्हे—
लक्झरी म्हणजे विनासायास 3-4 मजले चढण्याची क्षमता असणे
लक्झरी म्हणजे मोठे रेफ्रिजरेटर घेण्याची क्षमता असणे असे नाही.तर….
लक्झरी म्हणजे ताजे शिजवलेले अन्न दिवसातून 3 वेळा खाण्याची उपलब्धता आणि क्षमता असणे.
लक्झरी म्हणजे होम थिएटर सिस्टीम असणे अन त्यावर हिमालयीन मोहीम पाहणे नव्हे.
लक्झरी म्हणजे हिमालयीन मोहिमेचा शारीरिक अनुभव घेता येणे.
60 च्या दशकात एक कार असणे लक्झरी होती.
70 च्या दशकात टेलिव्हिजन असणे लक्झरी होती.
80 च्या दशकात टेलिफोन ही लक्झरी होती.
90 च्या दशकात संगणक एक लक्झरी होती …
मग आता लक्झरी म्हणजे नेमकं काय ??
तर आता लक्झरी म्हणजे ——-
—– निरोगी असणे, प्रामाणिक असणे, आनंदी असणे, आनंदी वैवाहिक जीवन असणे, प्रेमळ कुटुंब असणे, प्रेमळ मित्रांची सोबत असणे, गुरुंची सोबत असणे, प्रदूषित नसलेल्या ठिकाणी राहण्याचे ठिकाण असणे—–
आणि याच सर्व गोष्टी दुर्मिळ झाल्या आहेत —–
—–आणि ह्या दुर्मिळ गोष्टी आपणापाशी असणे हीच खरी आजची “ लक्झरी ! “
संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈