? वाचताना वेचलेले ?

☆ काळ जुना होता…! ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆  

काळ जुना होता

अंग झाकायला कपडे नव्हते,

तरीही लोक शरीर झाकण्याचा प्रयास करायचे

आज कपड्यांचे भंडार आहेत,

तरीही जास्तीतजास्त शरीर दाखवायचे प्रयत्न सुरु आहेत

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

*

काळ जुना होता, रहदारीची साधने कमी होती.

तरीही कुटुंबातील लोक

भेटत असत .. 

आज रहदारीची साधने भरपूर आहेत.

तरीही लोकांना न भेटण्याच्या सबबी सांगत आहे

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

*

काळ जुना होता,

घरची मुलगी अख्ख्या गावाची मुलगी होती.

आजची मुलगी ही

शेजाऱ्यापासूनच असुरक्षित आहे.

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

*

काळ जुना होता, लोकं

गावातील वडीलधार्‍यांची

चौकशी करायचे

आज पालकांनाच

वृद्धाश्रमात ठेवले जाते

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

*

काळ जुना होता,

खेळण्यांचा तुटवडा होता.

तरी शेजारची मुलं

एकत्र खेळायची .

आज खूप खेळणी आहेत,

मात्र मुले मोबाईलच्या कचाट्यात अडकलेली आहेत

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

*

काळ जुना होता,

रस्त्यावरील प्राण्यांना सुद्धा

भाकरी दिली जायची

आज शेजारची मुलंही

भुकेली झोपी जातात

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

*

काळ जुना होता,

शेजारच्या व आपल्या घरी

नातेवाईक भरलेले असायचे

आता परिचय विचारला तर–

आज मला शेजाऱ्याचे नावही माहीत नाही.

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

 

संग्राहिका – माधुरी परांजपे

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments