वाचताना वेचलेले
☆ विचारांचे आऊटपुट… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆
आपण जो जो विचार करतो तो आपल्या अंतर्मनात रेकॉर्ड होत असतो…… त्यामुळे त्याच विचाराचे आऊटपुट आपल्याला मिळत असते…
हे माझ्याने होणार नाही असे म्हणण्याचा अवकाश…. अंतर्मन तुम्हाला तसेच आऊटपुट देऊन ते तुमच्या हातुन कधीच होऊ देणार नाही अशी व्यवस्था करते….
किंवा, मला नशापाणी केल्याशिवाय चैन पडत नाही, त्याशिवाय झोप येत नाही असले विचार केल्यावर अंतर्मन तसेच फळ आपल्याला बहाल करत असते….
अमकी एखादी गोष्ट मी सहजच करुन दाखविन असे विश्वासाने म्हणण्याचा अवकाश….. मग ती गोष्ट कितीही अवघड असो….अंतर्मन ती गोष्ट सहजच करुन दाखवते….
हा अंतर्मनाचा चमत्कार होय….
अण्णा हजारेंनी जे विश्वासाने उपोषण चालवले आहे, त्या साऱ्या गोष्टीत त्यांचे अंतर्मनच त्यांच्या पाठीशी आहे…
हा अंतर्मनाचा मोठ्ठा चमत्कार आपण व सारे जग पाहतच आहे…
आपण सतत नकारात्मकच विचार करत आलो आहोत व आपल्या मुलाबाळांनाही आपण असेच नकारात्मक पणेच वागवत आलो आहोत………
हे तुझ्या हातून होणारच नाही…
तू अजून बच्चा आहे….
असले धंदे करुन काय तुझे पोट भरणार आहे का….
तू अगदी बावळटच आहेस ….. गधा आहेस…. तुला अक्कल नाही…
उगाच मोठ्या मोठ्या गप्पा मारु नकोस…
तुला कवडीचे ज्ञान नाही….
उगाच बकवास करु नकोस……
मुर्ख कुठला…तुझी लायकी नाही….
मोठे झाल्यावर कळेल तुला….
मुकाट्याने तुझा अभ्यास कर….
नको तो उपदव्याप करु नको…त्यात तुला यश येणार नाही….
उगाच मोठेपणाचा आव आणू नकोस…..
वगैरे बोलून आपण आपल्या पाल्यास अगदी नकारात्मक विचारांचा असा नेभळट करुन टाकतो…..
त्यांचे अंतर्मन आपण अंकुरीत होण्याच्या अगोदरच कोमजून टाकतो….
मग त्याला तसेच आऊटपुट मिळाल्यास नवल नाही….
मित्रांनो…
असे काही करु नका…
मुलांना तेजस्वी व कणखर मनाचे घडवण्यात आपलाच सहभाग असला पाहिजे…
कारण आपला पाल्य खूप काळ आपल्या संपर्कात असतो, त्याला मनाने समृद्ध व बलवान बनवा…
त्याला देशाचे कणखर नागरिक बनवा…
त्याचे अंतर्मन बलवान कसे होईल याकडे लक्ष द्या…
आपल्या चिमुकल्याला अंतर्मन जागृतीच्या साधना करायला सांगा….
जप तप, तीर्थाटण आदिंपेक्षा अंतर्मन कसे जागृत होईल याकडे लक्ष द्या…
त्याच्या हातून काहीही वाईट होणार नाही हे ही आवर्जून पहा…
संग्राहिका : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈