श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ अप्रूप पाखरे – 12 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
१. भांड्यातल्या पाण्याचा
स्वच्छ चमकता तळ
समुद्राचं पात्र किती
गहन…. गूढ…. अथांग …
छोट्या स्त्यांना जसे-
स्पष्ट, सोपे, शब्द
श्रेष्ठ सत्यांना वेढलेली
नि:शब्द खोल शांतता
२. स्तुती ओशाळं करते मला
कारण
अगदी चोरटेपणानं
मीच तिची भीक मागतो…
३.. वादळाला उत्तर देणारा आवाज
असतोच आमच्याजवळ
पानं म्हणतात आम्हाला…
सतत सळसळतो आम्ही,
पण तू रे कोण इतका गप्प?
मी?
मी फक्त फूल आहे.
४. त्या कडयाच्या
पार टोकावर बसवतोस
आपल्या प्रीतीला?
फार उंच आहे रे ते….
मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर
मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)
प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈