श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ उतरां आदीं छंदातच बळटा म्हजें गीत… श्री कौस्तुभ आजगावकर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पावलांच्या सुलुसानुच आंगार शिर्शिरी
सळसळटा पदर मना देग भर्जरी
काकणांचे किणकिणीन् स्पंद कानसुलां
वाऱ्यान् तुज्या झट्टिं म्हजेर पार्दिका फुलां
स्वास तुजें वास जावन् सांसपितात आंग
मनां म्हज्यां लागतां तुज्यां गुमानितां थांग
सकाळफुडें आयलें जाल्यार आंगणिं फुलतां पात
सांजचें पावलें जाल्यार येतां चान्नें फाटोफाट
असवडींय फळटा म्हाका मोनी तुजी प्रीत
उतरां आदीं छंदातच बळटा म्हजें गीत
– बा. भ. बोरकर
— तिच्या नुसत्या चाहुलीनेही मनात काव्य किती वेगवेगळ्या प्रकारे उमलत जातं त्याची ही कविता.
— आणि हा भरड मराठी तर्जुमा आहे. काव्यानुभव नव्हे, तर फक्त अर्थानुभव.
तुझ्या पावलांच्या चाहुलीनेच अंगावर गोड शिरशिरी येते
आणि पदराची सळसळ माझं मन भर्जरी करून जाते.
(तुझ्या) काकणांची किणकिण ऐकूनच कानशिलं थरथरून उठतात
आणि तुझ्या हलक्या वाऱ्यानेही प्राजक्ताची फुलं माझ्यावर बरसतात
तुझा श्वास सुगंध होऊन अंगाला लपेटून जातो (सांसपितात = चाचपतात)
आणि तेव्हाच मनात तुझी ओळख पटते (?)
सकाळी आलीस की अंगणात पात (सुगंधी हिरवं फूल) फुलते
संध्याकाळी आलीस की पाठोपाठ चांदणं अवतरतं ……
… अशा तुझ्या या शब्दांशिवाय व्यक्त होणाऱ्या प्रेमामुळे
शब्दांत उतरायच्या आधीच कविता गाणं होऊन मनात अवतरते.
लेखक : श्री कौस्तुभ आजगांवकर
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈