श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
वाचताना वेचलेले
☆ आयुष्य कुणी जास्त जाणलं?… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला….. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही.
तो एवढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत. गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही.
एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला —- खिशात दमडीदेखील नाही आणि फिरायला बाहेर पडतो.
त्याची नजर त्या भिकाऱ्याकडे – आणि त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते. त्या भिकाऱ्याच्या बाजूला एक पाटी, आणि दोन-तीन खडू पडलेले.
— हा लेखक त्या भिकाऱ्याकडे जातो आणि म्हणतो, ” मित्रा, मी एक लेखक आहे, ज्याच्याकडे एक पै देखील
नाही. पण माझ्याकडे कला आहे. माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे. ती मी तुला देऊ शकतो. तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का? “
” साहेब” भिकारी म्हणतो, ” माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही. मी एक गरीब आंधळा भिकारी. तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं ते करा.”
— तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघून जातो.
— त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की, एकदम जाणाऱ्या – येणाऱ्यापैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्या पुढ्यात पैसे टाकू लागलाय.
— थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते. तो भिकारी बेचैन होतो. नाण्यांची रास वाढतच जाते. तो एवढा अस्वस्थ होतो की पैसे टाकणाऱ्यांपैकी एकाचा हात पकडतो आणि म्हणतो, ” साहेब, माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल. मी एक गरीब आंधळा भिकारी आहे. मला कृपा करुन जर या पाटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील हो.”
— तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो—-
— “ वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी — आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी.”
— भिका-याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात.
——– आयुष्य कुणी जास्त जाणलं?—–
या ओळी लिहिणाऱ्या लेखकानं?—- त्या ओळी वाचून पैसे टाकणाऱ्या लोकांनी?— की इतक्या वर्षांनी रडणा-या त्या भिका-यानं?—–
तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल…
पण जर तुमची वाणी गोड असेल, तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल…
माणसाला बोलायला शिकण्यास (किमान) २ वर्ष लागतात…
पण ” काय बोलावे? ” हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते…
— ओढ म्हणजे काय? – हे जीव लावल्याशिवाय कळत नाही…
— प्रेम म्हणजे काय? – हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही…
— विरह म्हणजे काय? – हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही…
— जिंकण म्हणजे काय?– हे हरल्याशिवाय कळत नाही…
— दुःख म्हणजे काय?– हे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही…
— सुख म्हणजे काय?– हे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही…
— समाधान म्हणजे काय? – हे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही…
— मैत्री म्हणजे काय?– हे ती केल्याशिवाय कळत नाही…
—आपली माणस कोण? – हे संकटांशिवाय कळत नाही…
— सत्य म्हणजे काय? – हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही…
— उत्तर म्हणजे काय?– हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…
— जबाबदारी म्हणजे काय?– हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…
आणि….
— काळ म्हणजे काय? –हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही…
संग्राहक : श्यामसुंदर धोपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈