डॉ. ज्योती गोडबोले
वाचताना वेचलेले
☆ BF … बॉय फ्रेंड – (मनस्पर्शी नाते) — लेखक अज्ञात ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
काळानुसार बदलत जातो B F चा अर्थ …
एक छोटा मुलगा छोट्या मुलीला म्हणाला ! I am your BF! मी तुझा BF आहे
मुलीने विचारलं — What is BF?
मुलगा हसतो आणि म्हणतो… – म्हणजे Best Friend. खूप चांगला मित्र !
काही काळ जातो , मुलगा तारूण्यात प्रवेश करतो…
आणि ती मुलगी सुंदर युवती होते…
तो त्या युवतीला म्हणतो ; – I am your BF!
– मुलगी लाजत त्याच्या कानाशी हळूवार पणे विचारते… आता – What is BF?
— मुलगा म्हणाला – म्हणजे पुरूष मित्र – Boy Friend
काही वर्षानी त्यानी लग्न केले , त्यांना छान गोंडस बाळे झाली..
नवरा हसत बायकोला म्हणतो… — I am your BF!
– बायको हसत नवऱ्याला विचारते — What is BF? -आता BF म्हणजे काय
— नवरा पुन्हा हसतो आणि मुलांकडे पहात म्हणतो… – तुझ्या मुलांचा मी बाबा. Baby’s Father
आणखी काही काळ जातो, दोघे वृद्ध होतात…समुद्रकिनारी बसून मावळता सूर्य ते पहात होते…
वृद्ध तिला पुन्हा म्हणाला.. – सखे I am your BF!
– वृद्ध महिला हसली , आपल्या वृद्धत्वाच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या खूणांसह म्हणाली…
– What is BF ? — आता सांग BF म्हणजे काय
– वृद्ध आनंदात परंतु रहस्यमयी आवाजात म्हणाला…
— Be Forever — सदा एक दूजे के लिए !
जेव्हां वृद्ध जीवनाचा अखेरचा श्वास घेत होता , तेव्हाही म्हणतो…
— I am your BF!
— वृद्धा दु:खित अंतकरणाने विचारते : —- What is BF???
— डोळे बंद करत वृद्ध म्हणाला :
— म्हणजे Bye Forever — अलविदा सदा के लिए…
काही दिवसानी ती वृद्धा ही पंचतत्वात विलीन झाली…..
…. भिंती वर दोघांचे फोटो लावले….
…. मुलांनी त्यावर एक सुंदर वाक्य लिहिले…
…….. BF……. Besides Forever ….. कायमस्वरुपी जवळच आहेत……
संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈