सौ अंजली दिलीप गोखले
वाचताना वेचलेले
☆ आयुष्य म्हणजे काय आहे ? ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
आयुष्य म्हणजे काय..
एक धुंद संध्याकाळ, ४ मैत्रिणी , ४ कप चहा, १ टेबल …
आयुष्य म्हणजे काय..
१ इनोव्हा कार, ७ मैत्रिणी , आणि एक मोकळा पहाडी रस्ता ….
आयुष्य म्हणजे काय….
१ मैत्रिणीचे घर, हलकासा पाऊस, आणि खूप खूप गप्पा …
आयुष्य म्हणजे काय…
शाळेच्या मैत्रिणीसह, बुडवलेला तास, १ कचोरी, २ सामोसे, आणि बिलावरून झालेला वाद …
आयुष्य म्हणजे काय…
फोन उचलताच पडणारी मैत्रिणीची गोड शिवी, आणि सॉरी म्हटल्यावर अजून एक शिवी …
आयुष्य म्हणजे काय …
काही वर्षानंतर, अचानक जुन्या मैत्रिणीचा एक मेसेज, अंधुक झालेल्या काही ओल्या आठवणी, आणि डोळ्यातले पाणी …
आपण खूप मैत्रिणी जमवतो…
काही खूप जवळच्या मैत्रिणी बनतात …
काही खास मैत्रीणी होतात …
काहींच्या आपण प्रेमात पडतो…
काही परदेशात जातात…
काही शहर बदलतात …
काही आपल्याला सोडून जातात…
आपण काहींना सोडतो …
काही संपर्कात राहतात …
काहींचा संपर्क तुटतो …
काही संपर्क करत नाहीत … त्यांच्या अहंकारामुळे …
कधी आपण संपर्क करत नाही … आपल्या अहंकारामुळे …
त्या कुठेही असोत… कशाही असोत… आपल्याला त्यांची आठवण असतेच …
आपलं प्रेमही असतं…आपल्याला त्यांची उणीव भासते…आपल्याला त्यांची काळजीही असते ..
— कारण आपल्या आयुष्यात त्यांचं असं एक स्थान असतंच…
तुम्ही किती वेळा भेटता, बोलता, किंवा किती जवळचे आहात ते महत्वाचे नाही …
जुन्या मैत्रिणींना कळू दे, की तुम्ही त्यांना विसरला नाहीत …
आणि नवीन मैत्रिणींना सांगा, की तुम्ही त्यांना विसरणार नाही…
प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈