सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ ~ मानसिक डाएट ~ ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
ही कन्सेप्ट जरा नवीन आहे,पण ती तुम्ही समजून घ्याल, ही खात्री आहे.
“तुमच्या मनातल्या विचारांचा प्रचंड प्रभाव तुमच्या शरीरावर असतो.” मनाला सुद्धा डाएटिंगची तेवढीच गरज आहे का?बघू या.
मी बोलतोय ते एका टेस्टी आयुष्याची चव घेण्याकरता केलेल्या डाएट बद्दल..
स्वतःचं अवघं आयुष्य बदलून टाकायची ताकद आपल्या विचारांमधे असते.
मग त्यांना चांगलं हेल्दी ठेवायची जबाबदारी आपलीच असते.
तर मानसिक डाएट म्हणजे काय करायचं?
तर आपले विचार अधिकाधिक फिल्टर्ड कसे रहातील ह्याचा प्रयत्न करायचा.
तेलकट-तूपकट म्हणजे फडतूस-निगेटिव्ह विचार आपण करणार नाही.
अति-गोड म्हणजेच स्वत:च्या आनंदात दुसऱ्याला विसरुन जाणारे विचार आपण जवळ येऊ देणार नाही.
दररोज एकातरी व्यक्तीला आपण एक छान स्माईल देऊन खूश करु.
दुसर्यांच्या पर्सनल आयुष्यात डोकावून मजा घ्यायला लावणारे कुचके-नासके विचार फेकून देऊ.
आठवड्यातुन एकदा तरी साध्या विचारांची खिचडी-कढी खाऊ.
या अशा मूल्यशिक्षणाबरोबरच महत्त्वाचं आहे, ते स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक ओळखून स्वत:ला “रीझनेबल” बनवणं,
दुसर्यांच्या मतांना आदर देणं, दुसर्यांना वेळ देणं, संवाद चालू ठेवणं,
मनाचं वातावरण नेहमी हलकं फुलकं ठेवणं,
एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणं आणि बरंच काही.
या सगळ्यातला समतोल हरवला ना,
की आपल्या नात्यांना अपंगत्व येणारच
आणि मग नीट डायग्नोसिसच झालं नाही,
म्हणून मनाला कायमची बेडरेस्ट पण मिळू शकते.
माणूस आहे,
मनपण थकतं हो कधीकधी,
त्याला इंस्टंट एनर्जी मिळते, ती फक्त एक कप काॅन्फिडन्सच्या चहाने.वाह ताज !!!
सगळ्यात महत्त्वाचं
की,आपल्या डाएटचे साईड इफेक्ट्स खूप मस्त असतात.
लोक प्रेमातपण पडू शकतात तुमच्या.
तुमच्या चेहर्यावरचा ताण कमी होतो,
तुम्ही यंग वाटू लागता, टेन्शन्स कमी होतात, लाईफ पाॅपकाॅर्नइतकं हलकं होतं.
वास्तविक, मन ओके असेल
तरच लाईफ ओके असतं, नाही का?
असं ह्या डाएटचं व्रत
हे आजच्या सॅन्डव्हिच जीवनशैली मध्ये एक संजीवनी देईल हे नक्की.
साध्या आणि ताज्या विचारांचं सॅलड आपली नक्की काळजी घेईल.
शाकाहारी विचार लंबी ऊम्र देऊन जातील.
बदल हा नेहमीच चांगला असतो.
असा मानसिक डाएट एकदा करुन बघायला काय हरकत आहे ना ?
संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈