सौ.शशी.नाडकर्णी-नाईक
वाचताना वेचलेले
स्त्री… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी
जेव्हा विश्वकर्म्याने ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार स्त्री निर्माण करावयास घेतली, तेव्हा त्याने निगुतीने, शांतपणे काम करायला सुरूवात केली.
ब्रह्मदेवाने विचारणा केली.
“स्त्री निर्मितीसाठी एवढा वेळ का लागतो आहे?”
विश्वकर्म्याने उत्तर दिले, “तिची रचना करण्यासाठी मला पूर्ण करावे लागणारे सर्व तपशील तुम्हाला निवेदन करतो.”
- तिने सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये कार्य केले पाहिजे.
- ती एकाच वेळी अनेक मुले सांभाळण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
- तिने आलिंगन दिले की दुखापत झालेल्या गुडघ्यापासून, ते तुटलेल्या हृदयापर्यंत ती काहीही बरे करू शकली पाहिजे.
- तिने हे सर्व फक्त दोन हातांनी केले पाहिजे.
- ती आजारी असताना स्वत:चे स्वतःला बरे करू शकली पाहिजे. तसेच दिवसाचे १८ तास काम करू शकली पाहिजे.
ब्रह्मदेव प्रभावित झाले. “फक्त दोन हातांनी हे सर्व करणे ….. अशक्य आहे !”
ब्रह्मदेव जवळ गेले आणि त्या स्त्रीला स्पर्श केला.
“पण तू तिला खूप मऊ केले आहेस.”
विश्वकर्मा वदले,”ती मऊ आहे, पण मी तिला मजबूत बनवले आहे. ती काय सहन करू शकते आणि त्यावर मात करू शकते याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही”
“ती विचार करू शकते का?” देवाने विचारले…
विश्वकर्मा उत्तरले “ती नुसता विचार करू शकत नाही, तर ती तर्क करू शकते आणि वाटाघाटीही करू शकते.”
देवाने तिच्या गालाला स्पर्श केला….
“हा भाग गळतोय असं वाटतंय! तू या भागावर खूप ओझं टाकलं आहेस.”
“तिथे गळत नाहीये…
ते डोळ्यातील अश्रू आहेत.”
विश्वकर्माने देवाला सांगितले …
“ते अश्रू आणि कशासाठी?”
देवाने विचारले……
विश्वकर्मा म्हणाले
“अश्रू हे, तिचे दु:ख, तिच्या शंका, तिचं प्रेम, तिचा आनंद, तिचं एकटेपण आणि तिचा अभिमान व्यक्त करण्याचा मार्ग आहे.” …
त्याचा देवावर चांगलाच प्रभाव पडला,
“विश्वकर्मा, तू अतिशय प्रतिभावान आहेस.
तू सर्व गोष्टींचा विचार केला आहेस.
खरोखर अद्भुत घडण आहे ही एक स्त्री.”
■ तिच्यात पुरुषाला चकित करण्याची ताकद आहे.
■ ती संकटे हाताळू शकते आणि जड भार वाहून नेऊ शकते.
■ तिला आनंद, प्रेम आणि मते आहेत.
■ जेव्हा तिला किंचाळावेसे वाटते, तेव्हा ती हसते.
■ जेव्हा तिला रडावेसे वाटते, तेव्हा ती गाते, जेव्हा ती आनंदी असते, तेव्हा रडते आणि जेव्हा ती घाबरते, तेव्हा हसते.
■ ती ज्यावर विश्वास ठेवते त्यासाठी ती लढते.
■ तिचे प्रेम बिनशर्त आहे.
■ “एखादा नातेवाईक किंवा परिचित मरण पावल्यावर तिचे हृदय तुटते, परंतु तिला जगण्याची ताकदही मिळते.”
देवाने विचारले:
“तर मग ती एक परिपूर्ण प्राणी आहे?”
विश्वकर्माने उत्तर दिले:
“नाही. यात फक्त एकच त्रुटी आहे. तिचे महत्व किती आणि ती किती मौल्यवान आहे हे ती अनेकदा विसरते.”
स्त्री असणं अनमोल आहे
तिला स्वतःचा अभिमान वाटावा यासाठी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला हे कळू द्या.
संग्राहिका :सुश्री शशी नाडकर्णी-नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈