श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ हिंमत असती तर…? — (फक्त जराशी गंमत हं —) 😎☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
बायको समोर स्पष्ट बोलण्याची हिंमत असती तर…?
१….दशरथानं कैकेयीला स्पष्टपणे
नकार देत सांगितलं असतं,
की मी काही रामाला
वनवासात पाठवणार नाही.
तू दुसरा काहीतरी वर माग
आणि जास्त हट्टीपणा
केलास तर लक्षात असू दे,
की मला अजून दोन बायका
आहेत, तर कदाचित रामायण
घडलंच नसतं…!!
२…रामानं देखील सीतेला
स्पष्टपणे नकार देत
सांगितलं असतं, की मी
काही हरणाच्या मागे
जाणार नाही ऊन खूप आहे.
आज रविवार आहे
आणि जंगलात कशाला हवंय
तुला तेच हरीण. मला जमणार
नाही ..!! तरी देखील रामायण
घडलं नसतं.
थोडक्यात तात्पर्य :
बायकोला वेळीच नकार देणं.आवश्यक आहे
आणि हे ज्या दिवशी जमेल, त्यावेळी
कुठलेही रामायण घडणार नाही
पण, प्रभू रामचंद्रांना जे जमलं
नाही, ते आपल्याला तरी कसं
शक्य होणार…???
असो. चालल॔य तसंच चालू द्या,
उगाच भांडण नको …..!!!!!
संग्राहक : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com