डॉ. ज्योती गोडबोले
📖 वाचताना वेचलेले 📖
☆ …Mother’s Day म्हणजे …. ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
जिने बोट धरून पाटीवर अक्षर गिरवण्यास शिकवले… तिला मोबाईलवर टाईप करायला शिकवणं म्हणजे …Mother’s Day
लहानपणी आपल्या जिभेचे चोचले ज्या आईने पुरवले….. *तिला एखाद्या तांराकित हाॅटेल मध्ये दिलखुलास ट्रीट देणं म्हणजे…*,
…Mother’s Day
लहानपणी साडीच्या निर्या करायला जिच्याकडून शिकलो, ..त्या आईला केव्हातरी जीन्समध्ये पाहण्याची गंमत म्हणजे …. …Mother’s Day
ज्या आईने आपल्या चेहरा अगदी पुस्तकासारखा वाचून काढला … तिला या टेक्नोसॅव्ही जगात FB शी ओळख करून देणं म्हणजे … …Mother’s Day
बाबांची नजर चुकवून जिने साखरेच्या डब्यात साठवलेले पैसे आपल्यासाठी withdraw केले त्या आईला ATM..मधून पैसे काढायला शिकवणं म्हणजे … …Mother’s Day
जिचा हात पकडून आपण भरभर जिने उतरलो, आणि चढलो,…तिला आताच्या ESCALATOR …वरून सांभाळून घेऊन जाणं म्हणजे…. …Mother’s Day
Best wishes to wonderful and powerful mother
संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈