वाचताना वेचलेले
संपली बाबा ओल… कवी : मुरारी देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई
शोध घेत पाण्याचा
सारेच चाललेत खोल
भूगर्भातून आवाज येतोय
‘संपली बाबा ओल’
उपसा करतोस वारेमाप
अडवीत नाहीस पाणी
किती वर्षं वागणार आहेस
असाच येड्यावाणी?
पाण्यावाचून सजीव सृष्टी
सारीच येईल धोक्यात
बघ बाबा शिरतंय का
काहीतरी डोक्यात
निसर्गाने दिले तरच
भांडे आपले भरेल
विचार कर नाहीतर
पाणी तयार कोण करेल?
कवी: श्री मुरारी देशपांडे
संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈