वाचताना वेचलेले
☆ म्हणून मी नेहमी आनंदात असतो ☆ प्रस्तुती – श्री रवी साठे ☆
मी भूतकाळ चघळत नाही
मी भविष्याची चिंता करत नाही नियोजन करतो
मी वर्तमानात जगतो
म्हणून मी नेहमी आनंदी असतो ☺️
मी कुणाकडुन काडीची अपेक्षा करत नाही,
मी कुणाबद्दल राग मनात धरत नाही,
मी लगेच सगळ्यांना माफ करतो,
म्हणून मी नेहमी आनंदी असतो. ☺️
मी हायफाय राहण्यासाठी धडपडत नाही,
आपुलकीची आणि मैत्रीची किंमत नसणाऱ्यासाठी कधीच दुःखाने तडफडत नाही,
साधं राहून आपल्या माणसांत सुखानं रमतो,
म्हणून मी नेहमी आनंदी असतो. ☺️
कोण काय बोलतं ह्याचा मी कधीच विचार करत नाही,
कोणी काहीही बोलल तरी पुन्हा मी ते स्मरत नाही,
माझे जीवन स्वछंदी आहे, ते मी मजेत जगतो,
म्हणून मी नेहमी आनंदी असतो. ☺️
मला ना पदाचा ना ज्ञानाचा अहंकार,
तुच्छतेचा विचार कधी मनाला नाही भावला,
पाय जमिनीवर ठेवून, प्रसंगी अनवाणी चालतो,
म्हणून मी नेहमी आनंदी असतो. ☺️
जगायला काहीच भौतिक सुख लागत नाही,
म्हणून मी गर्वाने कधीच वागत नाही,
सगळ्यांशी प्रेमाने आदराने आपुलकीने वागतो,
म्हणून मी नेहमी आनंदी असतो. ☺️
जन्म शाश्वत आहे तसा मृत्यू देखील शाश्वत आहे, ही जाणीव आहे,
माझ्यातही दोष आहेत आणि काहीतरी नक्कीच उणीव आहे,
माझे दोष मी रोजच पाहून सुधारण्याचा प्रयत्न करतो,
म्हणून मी नेहमी आनंदी असतो.
“आपले आनंदी रहाणे हाच आपल्या निरोगी जीवनाचा मूलमंत्र आहे” ?
प्रस्तुती – श्री रवी साठे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈