श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ हातात सगळं आयतं पाहिजे….!!!! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
नागरीक मी भारत देशाचा
हातात सगळं आयतं पाहिजे….!!!!
वीज कधी वाचवणार नाही
बील मात्र माफ पाहिजे….!!!!
झाड एकही लावणार नाही
पाऊस मात्र चांगला पाहिजे….!!!!
तक्रार कधी करणार नाही
कारवाई मात्र लगेच पाहिजे….!!!!
लाचेशिवाय काम करणार नाही
भ्रष्टाचाराचा मात्र अंत पाहिजे….!!!!
कचरा खिडकीतून बाहेर टाकीन
शहरात मात्र स्वच्छता पाहिजे….!!!!
कामात भले टाईमपास करीन
दर वर्षी नवा वेतन आयोग पाहिजे….!!!!
जातीच्या नावाने सवलती घेईन
देश मात्र धर्मनिरपेक्ष पाहिजे….!!!!
मतदान करताना जात पाहीन
जातीयता मात्र बंद झाली पाहिजे….!!!!
कर भरताना पळवाटा शोधीन
विकास मात्र जोरात झाला पाहिजे….!!!!
नागरीक मी भारत देशाचा
हातात सगळं आयतं पाहिजे….!!!!
हातात सगळं आयतं पाहिजे….!!!!
कवी – अज्ञात
संग्राहक : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com