सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ फुललेल्या अबोलीस पाहून… — कवी : श्री चंद्रशेखर देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
फुललेल्या अबोलीचे
लाख फुलांनी असे बोलणे !
शब्दावाचून अंगोअंगी
असे जरासे धुंद बहरणे !
हिरव्या हिरव्या पानांमधुनी
फिकट केशरी रंग सांडणे !
नको कोणते अजून अलंकार,
असेच जरासे नटणे अन् मुरडणे!
द्यावे वाटे हृदयीचे असे काही
जरी नसते तुझे काही मागणे !
होते पाहून तुजला कृतार्थ
आमचे इथले येणे !
कवी : श्री चंद्रशेखर देशपांडे
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈