श्री कमलाकर नाईक
वाचताना वेचलेले
☆ “मुलांना मार…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆
आजकालच्या मुलांना हे कधीच कळणार नाही. पूर्वीच्या काळी खालील कारणांसाठी पण मुलांना मार मिळत असे!
- मारल्यावर रडल्या बद्दल.
- मारल्यावर न रडल्या बद्दल.
- न मारता रडल्या बद्दल.
- मित्रांबरोबर खेळल्याबद्दल.
- मित्रांबरोबर न खेळल्याबद्दल.
- मोठी माणसे बसली असताना तिथून ये जा केल्याबद्दल.
- मोठ्यांना उत्तर दिल्याबद्दल
- मोठ्यांना उत्तर न दिल्या बद्दल.
- खूप वेळ मार न खाता राहिल्यावर.
- उपदेशपर गाणं गायल्याबद्दल.
- पाहुण्यांना नमस्कार न केल्या बद्दल.
- पाहुण्यांसाठी केलेला खाऊ खाल्ल्याबद्दल.
- पाहुणे जायला निघाल्यावर त्यांच्याबरोबर जाण्याचा हट्ट केल्याबद्दल.
- खायला नाही म्हटल्यावर.
- सूर्यास्तानंतर घरी आल्यावर.
- शेजाऱ्यांकडे खाल्ल्याबद्दल.
- हट्टी असल्याबद्दल.
- खूप उत्साही असल्याबद्दल.
- बरोबरच्या मुलांमध्ये भांडणात हरल्याबद्दल.
- बरोबरीच्या मुलांमध्ये भांडणात जिंकल्याबद्दल.
- खूप सावकाश खाल्ल्याबद्दल.
- भराभर खाल्ल्याबद्दल.
- मोठे जागे झाल्यावर झोपून राहिल्याबद्दल.
- पाहुणे खात असताना त्यांच्याकडे बघत राहिल्याबद्दल.
- चालताना घसरून पडल्याबद्दल.
- मोठ्यांच्या कडे पाहत उभे राहिल्याबद्दल.
- मोठ्यांशी बोलताना दुसरीकडे पाहिल्याबद्दल.
- मोठ्यांशी बोलताना त्यांच्याकडे न पाहिल्याबद्दल.
- मोठ्यांशी बोलताना एकटक पाहिल्याबद्दल.
- रडणार्या मुलाकडे पाहून हसल्याबद्दल.
उगाच नाही आपण इतके निर्मळ, शहाणे झालो…
लेखक:अज्ञात
संग्राहक – श्री कमलाकर नाईक
फोन नं 9702923636
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈