वाचताना वेचलेले
☆ मम्मी म्हणा, मदर म्हणा,— ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆
☆
मम्मी म्हणा, मदर म्हणा,
आई शब्दात जीव आहे.
*
पिता म्हणा, पप्पा म्हणा,
बाबा शब्दात जाणीव आहे.
*
सिस्टर म्हणा, दीदी म्हणा,
ताई शब्दात मान आहे.
*
ब्रो म्हणा, भाई म्हणा,
दादा शब्दात वचक आहे.
*
फ्रेंड म्हणा, दोस्त म्हणा,
मित्रा शब्दात शान आहे.
*
रिलेशन म्हणा, रिश्ता म्हणा,
नातं शब्दात गोडवा आहे.
*
हाय म्हणा, हॅलो म्हणा,
हात जोडणे संस्कार आहे.
*
सर म्हणा, मॅडम म्हणा,
गुरु शब्दात अर्थ आहे.
*
ग्रँड पा, ग्रँड मा
या शब्दात काहीच मजा नाही,
आजोबा आणि आजी
यासारखे सुंदर नाते जगात नाही.
*
गोष्टी सर्व सारख्याच आहेत,
पण फरक फार अनमोल आहे.
*
‘अ’ ते ‘ज्ञ’ शब्दात ज्ञानाचे भांडार आहे…
म्हणून मराठीत आदर जास्त आहे.
☆
संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈