श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 22 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

 

[१०५]

टेकड्या-टेकड्यांची    

पाकळी न् पाकळी उलगडून

प्रकाश प्राशन करणारा

हा पर्वत

किती गोजिरवाणा दिसतो

एखाद्या प्रफुल्लित फुलासारखा….

 

[१०६]

प्रकाशाने झगमगणार्या 

दिवसाच्या या हिरव्यागार जगाला

स्पर्श करण्यासाठी

उचंबळत आहेत अनावर

माझ्या गीतांच्या

या लालस लाटा

काळजाच्या गाभ्यातून

 

[१०७]

मीलनाची ज्योत

तेवत राहते

रेंगाळत –  रेंगाळत

पण विरहाची फुंकर

फक्त एका क्षणाची

आणि

फटकन विझून जाते ज्योत

 

[१०८] 

संपून गेली एकदाची

दिवसभराची कामं

लपेटून घे मला

तुझ्या आणि तुझ्याच कुशीत

स्वप्नं पडू देत ग मला-  

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments