श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ विश्वविक्रम….उदयन ठक्कर – अनुवाद…अनामिक ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆
एका कवीने
लिम्का बुक ऑफ वल्ड रेकॉर्डला पत्र लिहिले,
मी नवीन काव्यप्रकाराचा शोध लावला आहे
त्यात फक्त दोनच ओळी आहेत
पहिल्या ओळीत दोन शब्द व
दुसर्या ओळीतसुद्धा दोन शब्द आहेत
म्हणून हा काव्यप्रकार थोडक्यात थोडका आहे
आणि विश्वविक्रम आहे.
माझी विनंती आहे की आपल्या पुस्तकात याची नोंद कराल का?
कवींना उत्तर मिळाले ‘नोंद नाही करणार’
हे उत्तर थोडक्यात थोडके म्हणून उत्तरसुद्धा विश्वविक्रम आहे.
मूळ कवी – उदयन ठक्कर
अनुवाद – अनामिक
संग्राहक – अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈