सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ विविधा ☆ आमची अंदमान सफर… भाग-3 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
छोट्या बोटीतून जाताना आम्हाला भीती वाटत होती,पण त्या बोटीवर काम करणारे लोक मात्र लीलया या होडीतून त्या होडीत जा -ये करत होते.
दूरवर दिसणारी छोटी छोटी बेटं हिरवीगार दिसत होती. त्या हिरवाईचे प्रतिबिंबच जणू पाण्यात दिसत होते! या बीच वर काचेच्या बोटीतून समुद्रात खोलवर घेऊन जातात, तेव्हा पायाशी असलेल्या काचेतून समुद्राच्या तळाशी असलेले तर्हेतर्हेचे रंगीबेरंगी मासे, कोरल्स, कासवं आणि खूप रंगीत रंगाचे दगड-गोटे आणि काय काय पहात होतो ते सांगता येत नाही. त्या बोटीतून बाहेर पडल्यावर आम्ही तिथे स्नाॅर्केलिंगही केले. समुद्राच्या तळातील दौलत बघता-बघता चार पाच तास कसे गेले कळलंच नाही.
या नंतर पोर्टब्लेअर चा मुक्काम संपवून आम्ही दुसऱ्या दिवशी राॅस आयलंड बघण्यासाठी निघालो.
क्रमशः…
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈