सौ. मुक्ता महेश अभ्यंकर
विविधा
☆ ग्राइप वाॅटर ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆
काय झाले बाळ रडत होते वूडवर्डस ग्राईप वॉटर दे त्याला
काय झाले बाळ रडत होते वूडवर्डस ग्राईप वॉटर दे त्याला हि जाहिरात आपण वर्षोनवर्षे पहात व ऐकत आलो आहोत. पण हे ग्राईप वॉटर म्हणजे नक्की काय ?
विलिअम वूडवर्डस या औषध निर्मात्याने इंग्लंडमध्ये १८५१ साली ग्राइप वॉटरचा शोध लावला. १८४० साली पूर्व इंग्लंडमध्ये लहान मुलांमध्ये फेन फिव्हरची लागण होत होती. त्याच वेळी तेथे हिवतापाचीही साथ होती. या दोन्ही रोगांवरील उपचारांतून प्रेरणा घेऊन वुडवर्डने ग्राइप वॉटरची निर्मिती केली. फेन फिव्हरसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाने बालकांमधील पचनसंस्थेच्या तक्रारी दूर होतात असे त्याचे निरीक्षण होते.
वुडवर्डच्या मूळ ग्राइप वॉटरमध्ये ३.६ टक्के अल्कोहोल, बाळंतशेपू तेल, सोडिअम बायकार्बोनेट, साखर तसेच पाणी हे घटक होते. १८७६ मध्ये वुडवर्डने ग्राइप वॉटर या ट्रेडमार्कची नोंदणी केली.
कधीकधी ग्राइप वॉटरमध्ये बडीशोप व आल्या चाही समावेश असतो.
शेपा जे ग्राइप वॉटर चे मूळ घटक आहे ह्याचे शास्त्रीय नाव Anethum graveolens असे आहे. अंबेलिफेरी कुटुंबातली ही पालेभाजी इंग्रजीत Dill या नावाने ओळखली जाते. यास बाळंतशोपा असेही नाव आहे. Anethum हे नाव ग्रीक ऍनिसोन या शब्दापासून बनवले आहे ज्याचा अर्थ तीव्र वास असा होतो. Dill या शब्दाचे उगम सॅक्सन शब्द Dillan हया शब्दापासून झाले आहे. Dillan means dull the restless child to sleep, म्हणजेच अस्वस्थ मुलाची अस्वस्थता कमी करणे.या ३० ते ९० सेंमी. उंचीच्या ओषधीय बहुवर्षायू पालेभाजीचे मूलस्थान भूमध्य सामुद्रिक प्रदेश असून भारतात तिचा प्रसार सर्वत्र आहे. खानदेश व गुजरातमधील काही भागांत शेपूची मोठया प्रमाणात लागवड करतात. दक्षिण यूरोप व पश्चिम आशियात ती लागवडीत आहे.
हिरव्या लहान पानाची ही भाजी शरिरासाठी उपयोगी आहे. ही द्विदलीय फूले असणारी वनस्पती आहे. शेपू ची फुले लहान पिवळी व संयुक्त चामरकल्प फुलोऱ्यात साधारण जुलै-ऑगस्टमध्ये येतात
यूरेशियामध्ये शेपू मोठ्या प्रमाणात घेतले जाते जेथे त्याची पाने आणि बियाणे अन्नासाठी चव येण्यासाठी औषधी वनस्पती किंवा मसाला म्हणून वापरली जातात. ह्याची फळे व बिया सपाट आसतात. पालेभाजी तिखट, कडवट असते.शेपू फळामध्ये बाष्पनशील किंवा उडनशील तेल असते. ह्या तेलात दिल अपियोल , अनिथॉल, युजिनॉल व कॅरवोन हे घटक असतात. अल्फा फिलाँड्रीन लिमोनिन डिल इथेर ह्या तेलातील घटकामुळे शेपूला एक विशिष्ठ सुवास येतो. हयात व्हिटॅमिन अ व व्हिटॅमिन क व फ्लावनॉइड मोठया प्रमाणात आठळतात. पोटदुखी, दात येतानाची वेदना, पोट बिघडणे, तसेच पचनसंस्थेच्या इतर तक्रारींसाठी लहान बालकांमध्ये ग्राइप वॉटर दिले जाते.शेपू कफवातनाशक, शुक्रदोषनाशक , कृमिनाशक समजतात.हा बाळंतशेपा म्हणून ओळखला जातो. गर्भवती महिलांना शेपा पचना साठी व निद्रानाश ह्यासाठी उपयुक्त आहे. नैराश्य दुर करण्यासाठी डिल चा वापर करता. अरोमाथेरपी मध्ये डिल तेल चा वापर होतो. डायबिटीस असलेलया लोकांमध्ये साखरेचे नियंत्रण ठेणवण्यासाठी हि शेप्याचा उपयोग होतो. डिल तेल कीटक प्रतिबंधक म्हणून वापरले जाते. शेतकरी बऱ्याचदा बुरशीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी इतर धान्याबरोबर शेप्याची लागवड करतात. स्वयंपाकघरात शेपा आणि जिरे ह्यांचा एकत्रित उपयोग मसाला म्हणून करतात. स्वयंपाकात ह्याचा उपयोग केल्यास पदार्थ चविष्ट बनतो.असा हा बहुगुणी स्वास्स्थवर्धक शेपा आपल्या स्वयंपाक घरातील आवश्यक घटक आहे.
© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर
साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे
संपर्क : सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.
फोन : ७५०६२४३०५०
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈