सौ. शशी नाईक-नाडकर्णी
शिक्षा- बी.कॉम
नोकरी- युनियन बॅक ऑफ इंडिया, अधिकारी निवृत्त – 2017
अभिनयाची आवड,सिध्दार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स एन्ड इक्नोमिक्स मध्ये मराठी एकांकीका ‘ सारे कसं शांत शांत.’ अभिनयाचे पारितोषिक
निवृत्तीनंतर पौरोहित्याचा अभ्यास चालू आहे. सुगम संगीताची आवड. जुनी नाती जपणे. नवीन माणसं जोडण्याची आवड.
☆ विविधा ☆ दैवगती ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
“आई,छानशी गोष्ट सांग ना, आजी झोपायच्या आधी रोज गोष्ट सांगायची. श्रावणांत तर तिच्या पुस्तकातली आटपाट नगर वाली कहाणी सांगायची”. श्रुतीला गोष्ट सांगितल्याशिवाय माझी सुटका नव्हती. तसेच सगळं काम ठेवून तिला घेवून बेडरूम मध्ये आले.
चला चालू —- “आटपाट नगर—– तिकडे एक भाऊ आणि बहिण भाऊ —— भावाकडं पूजा होती——–माझी गोष्ट चालूच होती. तात्पर्य काय? शेवटी दिवस कोणाचे कधी बदलतील सांगता येत नाही म्हणून कोणी कोणाला हंसू नये, कमी लेखू नये.अरेच्चा पण हे ऐकायला आमचे बाळ जागं कुठे आहे ? ते तर केव्हाच झोपलं.
ती झोपली तरी आम्ही ऐकली ताई तुमची गोष्ट. लगेच इकडून तिकडून एकदम आवाज आले. दांडीवरचा गाऊन सांगू लागला काल पर्यंत ती पैठणी,कांजीवरम् तो-यांत मिरवायच्या आणि मला हसायच्या .आज पाच महिने झाले कश्या गपगुमान कपाटात पडून आहेत.
तेवढ्यात बेसिनवरचा डेटॉल हॅण्डवॉश ओरडला ,”एकदम बरोबर रोज बाहेर पडतांना दादा ,ताई सगळेजण फुस्. फुस सेंट मारून जायचे.अगदी आजी आबांना उग्र वासाचा त्रास झाला तरी. आणि ती सेंट ची बाटली माझ्या कडे तुच्छतेने बघायची.पण आता दिवस फिरले.आबांपासून ते छोट्या श्रुतीपर्यंत अगदी कामावाल्या मावशीं सुध्दा सकाळ संध्याकाळ मला हातावर घेऊन कुरवाळतात.
“हो रे बाबा सध्या तुम्हालाच चांगले दिवस आले आहेत. तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत.”
तेवढ्यात जाऊबाई ने खणाचा शिवलेला मास्क बोलू लागला कित्येक महिने मी वहिनीच्या कपाटात पडून होतो.परवा you tube वर वहिनी ने खणांचा मास्क बघितला आणि माझं नशीब फळफळलं.आता सगळे मला
त्यांच्या चेह-यावर विराजमान केल्याशिवाय बाहेर पाय टाकत नाही.शशांकदादांचा बिच्चारा टाय. पाच महिने त्याला बाहेरचं दर्शन नाही.
हो ना . करोना ने तर सगळ्या सृष्टीचीच उलथापालथ केली.
तेवढ्यात कोप-यातून हुंदका आला. माझी सुंदर लाल प्लॅस्टीकची पिशवी रडत म्हणाली ,’ताई करोनाने नाही काही त्याच्या आधीच आमचं नशीब रुसलं.”
रद्दी तिला डावलून खुद्कन हसून म्हणाली ,”मारे हिणवत होतीस ना ,आमच्या शिवाय कुणाच काही चालत नाही. कागदा, तुझा उपयोग काय ? Xxपुसायला. पण तुझ्या हे लक्षात नाही आले आजपर्यंत जे शिकले सवरले ते आमच्यामुळेच.पण हे लक्षात यायला अक्कल लागते ना.”
म्हणजे थोडक्यात काय? चांगले वाईट दिवस सगळ्यानाच असतात. सजीव असो वा निर्जीव .म्हणून कोणाला कमी लेखू नये .त्याची चेष्टा करू नये.
ही साठा उत्तरांची कहाणी—
© सौ. शशी नाईक-नाडकर्णी
फोन नं. 8425933533
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈