सौ. विद्या पराडकर
विविधा
☆ भारताचा प्रजासत्ताक दिन व महत्व… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆
आला आला दिन सोनियांचा
प्रजासत्ताक दिन बहुमोलाचा
खरेच भारताच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा दिन हा दिन म्हणजे भारतीय इतिहासाचे एक सुवर्ण दालन.
दिडशे वर्षांच्या गुलामगिरी नंतर आमच्या भारत मातेच्या पायातील परदास्याच्या श्रुखंला देशभक्तांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन तोडल्या.भारत मातेच्या म्लान मुखावर चे करूण अश्रू त्यांना पाहवले गेले नाही. ते देशभक्त भारत मातेला म्हणाले. कुसुमाग्रजांच्या शब्दात
“कशास आई भिजविली डोळे
उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल”
खरोखरच देशभक्तांच्या अविरत व भगिरथ प्रयत्नांनी 15 आगस्ट 1947 ला भारतमाता स्वतंत्र झाली. स्वातंत्र्याच्या तेजाने तिचे मुख मंडल उजळले.
बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार केली. व 26 जानेवारी जा 1950 पासून तिची अंमलबजावणी झाली. 26 जानेवारी हाच आपला प्रजासत्ताक दिन होय. हयाला गणराज्य दिन व इंग्रजीत Republic day असे म्हणतात. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता.
एकाधिकार नाही, हुकूमशाही नाही, राजेशाही नाही. हा दिन स्वतंत्र भारताचा मानबिंदू तर आहेच पण राष्ट्रीय सण आहे. मोठया उत्साहाने, जोमाने, दिव्यांची रोषणाई करण्यात येते. तिरंगा मोठ्या दिमाखात डोलत असतो. प्रेसिडेंटचे भारत वासियांना उद्येशून भाषण होते.देशभक्तीपर गीतांनी आसमंत भारावला जातो.
स्वतंत्र भारताचा प्रजासत्ताक दिन आज 74वर्षाचा झाला आहे. आजपर्यंत च्या कालावधीचा विचार केल्यास, सिंहावलोकन केल्यास आपल्या ला कळेल खरेच आपला देश प्रगत देशात का समर्थ नाही?
देशापुढै आज निरनिराळ्या समस्या मगरी सारख्या मागे लागल्या आहे. अंतस्थ व बाह्य शत्रूंची चुरस लागली आहे.देशाची एकता भंग पावली जणू. स्वार्थ, भ्रष्टाचार, देशद्रोही वृत्ती सतत वाढत आहे.
भौतिक समस्या, नैसर्गिक समस्या, वैज्ञानिक समस्या, आरोग्यविषयक समस्यांचे डोंगर वाढत आहे.
पूर्वजांनी कमावलेल्या स्वातंत्र्याची व देशभक्तांची जाण असणे हे स्वतंत्र भारताच्या नागरिकांचे व मतदारांचे मुख्य कर्तव्य आहे. घटनेने आपल्याला हक्क दिले म्हणजे कर्तव्य आलीच.
प्रो.लाॉस्की यांच्या मताप्रमाणे हक्क व कर्तव्ये एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
आजचे तरुण हे उद्याचे देश निर्माते आहेत. प्रकर्षाने त्यांनी प्रजासत्ताक दिनाचा मतितार्थ समजून वागल्यास पुढला अनर्थ टळला जाईल. मला देशाने काय दिले हे म्हणण्यापेक्षा मी देशाला काय दिले हे महत्त्वाचे नव्हे काय?
प्रजासत्ताक दिन योग्य अर्थाने साजरा करायचा असेल तर मतदार व सुजाण नागरिकांनी देशहिताचा विचार केला पाहिजे. poverty in the land of plenty हे अजुनहीआहे. याचा विचार केला पाहिजे. सेतू बांधायला एक एक दगड लागला.
दुसऱ्या महायुध्दात हिरोशिमा व नागासाकी ह्यांची काय गत झाली हे सर्व श्रृत आहे.हा देशभक्तीचा विजय आहे.
भारताचे प्रजासत्ताक यशस्वी होण्यासाठी जाज्वल्य देशाभिमान जागृत असण्याची गरज आहे.
“साथी हाथ बढाना” या गीताची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
सरतेशेवटी
चमका बनकर अमन का तारा
प्रेम की धरती देश हमारा
जय जय हिंदुस्थान, जय जय गणराज्य दिन
स्वतंत्र भारताची नागरिक म्हणून शुभेच्छा व्यक्त करते प्रजासत्ताक दिन चिरायू होवो या अपेक्षेत लिखाणाला विराम देते.🌷
संग्राहिका – सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈