श्री अमोल अनंत केळकर
☆ विविधा ☆ भाई… भाग – 4 ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
*तुला शिकवीन चांगलाच धडा*
पुढची ओळ काय बरं ?
तुला शिकवीन चांगलाच धडा,
समीक्षक आहेस ना तू ?
मग माहितीही पाहिजे खडान,खडा
कोण आहे ?
मी सुनीता देशपांडे
अहो , सुनीता बाई ? तुम्ही स्वतः ?
हो. आश्वर्य वाटलं? ? भाई येऊ शकतात , तर मी नाही ?
नाही तस नाही.
भाई – उत्तरार्ध ची जहिरात बघितलीस?
हो हो बघितली, ती फुलराणी आठवत होतो, ‘तुला शिकवीन चागला धडा’.
हं ८ तारखेनंतर दुसरा भाग बघशील, त्यावर मग परीक्षण/समीक्षा ??? लिहिशील.म्हणलं त्या आधीच तुझी शाळा घ्यावी. काही हरकत ?
छे! मी कोण हरकत घेणारा ? चूक समजली की सुधारायला मदतच होते की .साक्षात ‘ बाळासाहेब ठाकरें’ ना वर्गाबाहेर उभे करणा-या तुम्ही , माझी हिम्मत तरी आहे का तुम्हाला नाही म्हणायची ?
हं, प्रासंगिक विनोद निर्मिती करताना ही वास्तविक विचार करता आला पाहिजे. त्यावेळी वर्ग चालू असताना ‘ वहीत ‘ व्यगंचित्रे काढणारा तो खरोखरच ‘ बाल’ ठाकरे माझा विद्यार्थी होता. त्याचे ‘ बाळासाहेब’ नंतर झाले होते.
बरं, दाखव ते तू मागे लिहिले दोन भाग – भाईं वरचे
हो हो , घ्या हे घ्या मोबाईल .अनुदिनीत मी लिहिलेले कायम ठेवतो मग मिळायला सोपे जाते .
नाही मला लिखित स्वरूपातले पाहिजे आहे.
कागदावर लिहिलेले लेखन माझ्याकडे नाही. जे काही असेल ते मोबाईलवरच करतो.
आणि मग झालेल्या शुध्द्व लेखन , व्याकरणाच्या चुका तशाच राहतात. इतरही पुढे ढकलणारे चुका दुरुस्त न करता तसेच पाठवतात. काय गडबड आहे एवढं प्रसिध्द व्हायची ? आम्ही एखादी गोष्ट , लेख लिहायचो, चारदा तपासायचो मग पोस्टाने संपादकांना पाठवायचो मग त्यांच्या उत्तराची वाट बघायचो. खुप वेळ जायचा आणि मग उत्सुकता ही रहायची छापून यायची. ती मजा तुमच्या पिढीला नाही. आलं मनात, लिहिलं, टाकले फेसबुक, Whatsapp वर
जे लिहितात ते नीट कागदावर लिहा, तपासा. असा पेपर संग्रही राहतो , वेळप्रसंगी परत लगेच मिळतो , आवश्यक बदल करता येतात. लावून घ्या ही सवय.
हो हो सुनीता बाई.
कितीही काल्पनिक लेखन असलं तरी ज्या व्यक्तीवर आपण लिहीत आहोत त्याच्या मुळ स्वभावा विरुध्द्व चे चित्र सादर करणे/ लिहिणे चुकीचेच. अशा लेखाची
‘हवा आठवड्यातून फारतर दोन दिवस राहते’. कायमस्वरुपी नाही
हं , एखादे उदाहरण द्याल ?
हे बघ तुझा लेख.
स्वर्गात मी आणि भाईं मधील चर्चा खुमासदार झालीय यात शंकाच नाही . पण मी भाईंना म्हणते भाई लवकर निघून पर्वतीवर जाऊया , सारसबागेतील गणपतीला जाऊ या ?
मी म्हणते तसं वय्यक्तिक संदर्भ इथे येतात.
अरे भाईच्या अखेरच्या घटका शिल्लक असतानाही मी कधी ‘देव’ आठवला नाही , सत्यनारायणाचा ‘प्रसाद’ ही मी निव्वळ ‘शिरा’ म्हणून खाल्ला आणि तू मला सरळ सारसबागेतल्या देवळात घेऊन गेलास ? ही मोठी विसंगती, चूक
हो हो आलं लक्षांत.
त्या पेक्षा पुण्यातील एका परिसंवादाला हजेरी लावू, किंवा एखादं मस्त नव्या कलाकारांच नाटक बघू हे चाललं असत रे.
हो हो खरं आहे तुमचं
परीक्षण करताना किंवा समीक्षा करतां ऋण / धन दोन्ही बाजूचा विचार केला पाहिजे . एकाच बाजूने लिहिणे बरोबर नाही ना ?
खरं आहे पण सिनेमात ऋण बाजू अशी वाटली नाही
का नाही ? काही जणांनी त्यावर लिहिलं की
कशाबद्दल बोलताय , कळलं नाही
हेच भाईंचे सिगरेट ओढणे, ड्रिंक्स घेणे, त्यासाठीची धावपळ. याची आवश्यकता होती का नव्हती? असेल तर का ? नसेल तर का नको?याचा सर्वसमावेशक विचार परीक्षण लिहिताना व्हायला पाहिजे.
मात्र हे दाखवलेले कितपत खरं आहे याची ‘ सत्यता’ समजणे फार अवघड आहे. मग यातून वाद – विवाद अटळ.
खरं आहे.
तुम्ही जेव्हा बायोपिक सारखे सिनेमा करिता तेव्ह्या व्यक्तिगत आयुष्यातले कांगोरे कितपत दाखवावे आणि नेमके कशावर फोकस करावा हे ठरवणे फार अवघड जाते
नुकतेच सगळ्यांनी पाहिलेले एक ‘कडक’ उदाहरण म्हणजे
‘ आणि डाॅ काशिनाथ घाणेकर . . . .
हा सिनेमा आहे तसा स्वीकारला गेला कारण सिनेमात
व्यसना संबंधीत दाखवलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्ष जीवनातील गोष्टी मिळत्या जुळत्या होत्या. निदान तशी माहिती अनेकांना होती. मात्र भाई सिनेमातील प्रसंग आणि दाखवलेली पार्श्वभूमी तशी ब-याच जणांना धक्कादायक वाटून गेली. याचे योग्य प्रतिबिंब एक समिक्षक म्हणून लिहिलेल्या लेखात यायला पाहिजे.
चल निघते मी, दुस-या भागात विजया ताईंनी ‘ सुंदर मी होणार ‘ ची आठवण सांगितली आहे तसे आता तू ही ठरव
‘सुंदर मी लिहिणार ‘ . शुभेच्छा
धन्यवाद सुनीता बाई ?
© श्री अमोल अनंत केळकर
१६/१/१८
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com