सौ. अंजोर चाफेकर
विविधा
☆ मनाचे प्रोग्रामिंग… ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆
आपल्या मेंदूमधे 1000 कोटी न्यूराॅन्स असतात.
आणि हे न्यूरल नेटवर्क खूप प्रभावी असते.
जर आपण या नेटवर्कला चांगला इनपुट दिला
तर नक्कीच चांगले आउटपुट मिळेल.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) मधे सुद्धा कृत्रिम न्यूराॅन नेटवर्क बनविले ते.
आणि मग पाहिजे ते इनपुट देऊन नेटवर्क ऑपरेट करतात.
धीरूभाई अंबानीजी त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात, माझ्यापुढे खूप आव्हाने उभी होती. अडचणींचे डोंगर मार्गात आडवे होते.अपयशाचे अनेक फटके बसले. पण मी अडचणींकडे शिकण्याची संधी म्हणून बघितले. मनाला असे प्रोग्राम केले की प्रत्येक अडथळा मला नवीन दिशा दाखवत गेला.
जेव्हा आपण मोठी स्वप्ने साकारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लहान गोष्टींमधे घुटमळू नये. संत ज्ञानेश्वर एक दाखला देतात.
सांगे कुमुद दळाचिने ताटेl
जो जेविला चंद्रकिरणे चोखटेl
तो चकोरू काय वाळुवंटी l
चुंबितु असे।
जो चकोर चन्द्रकिरण चाखतो तो कशाला वाळूचे कण चाखेल?
मनाला असे प्रोग्राम करायचे की क्षुल्लक गोष्टींकडे लेट गो करता आले पाहिजे.
कुठलीही कृती करताना आपली सत् सद विवेकबुद्धी जागृत असली पाहिजे. कारण कधी कधी भावनेच्या भरात किंवा मोहात पडून चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडतात पण मग अपराधीपणाची भावना सतत टोचत राहते.
उदा. महान सायन्टीस्ट ओपनहायमर यांनी अमेरिकेसाठी ऑटमब्माॅम्ब बनवला.जेव्हा मेक्सिकोच्या डेझर्टमधे त्याचे टेस्टिंग झाले तेव्हा ते इतके आनंदात होते. “गाॅड इज अब्सेंट” असे ते म्हणाले. परंतु नंतर मरेपर्यंत त्यांना गिल्ट फिलींग राहिले. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी मात्र ऑटमबाॅम्ब बनवायला नकार दिला.
मनात कुठल्या गोष्टी साठवायच्या व कुठल्या गोष्टी डिलीट करायच्या याचेही प्रोग्रामिंग करता आले पाहिजे. आपले मन वाईड लेन्स कॅमेरा सारखे असते. प्रत्येक पिक्चर क्लिक करत जाते. शिवाय मनाची स्टोरेज कपॅसिटीही प्रचंड असते. परंतु मनाला त्रास देणा-या गोष्टी, मत्सर, असुया, राग, द्वेष ताबडतोब डिलीट करता आल्या पाहिजेत.
© सौ.अंजोर चाफेकर
मुंबई.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈