विविधा
☆ मातृदिनानिमित्त – लेकीस पत्र सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆
प्रिय सौ.अंजूस..
शुभ आशिर्वाद.
आज जागतिक मातृदिन…
तूं आई झालीस तो क्षणं आमच्या आयुष्यातील खूप सुंदर क्षणं होता.
आनंदाची फुलं ओंजळीत घ्यावा असाच.आतां तूं दोन मुलांची-सुप्रिया, निरंतरची आई आहेस. अन् सूनेचीही म्हणजे सौ.गायत्रीची.. तुझं आईपण तूं छान अनुभवतेस अन् निभावतेसही…! ते पाहून माझी ओटी भरुन गेलीय. यापेक्षा आतां मला काय हवं..
तुझ्या आईपणाचा अभिमान वाटतो.
खरंतर आतां आपलं नात॔ नकळत बदलत चाललय– आयुष्याच्या यावळणावर..! माय-लेकी तर आहोतच आपण. तुझ्या उमलत्या वयात छान मैत्रीणी झालो होतो. आतां या नात्यात भूमिकांची अदलाबदल होत असते कधी-कधी…! तूं माझी आई अन् मी तुझी लेक…
ही भूमिकाही तूं छानच पेलतेस 😢
मायेइतकचं दटावतेसही.
आवडते ही तुझी-माझी बदलती भूमिका मला..!👍
या तुझ्यातील आईला-आईपणाला मनापासून खूप सुंदर शुभेच्छा.🌹
– तुझीच आई..
© शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈