सुश्री अपर्णा परांजपे
कवितेचा उत्सव
☆ राधाकृष्ण… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆
(राधा ही कृष्णाची आत्मशक्ती…)
✍️सुखाचा जो उगम असे तो आत खोल हृदयात
मनास जागृत करून मग तो
राही आनंदात…
वरवर भासे सुख ते मिथ्या निश्चित हे जाण
ॐ कारातच स्वस्थ जीव मग भगवंताची आण…
*
रज्जू भासे सर्प तो खरा केवळ माया आहे
बुद्धी मात्र निरंतर हा भार वाहते आहे……
*
कुंडलिनी निद्रिस्त असे की जग वाटे सत्य
रज्जू दिसला सर्प पळाला खरे महद्भाग्य…..
– अपर्णा परांजपे
*
मोहन तल्लीन होतो कारण हृदयी आहे राधा
कुंडलिनी ही कृष्णाची असे नियम साधा…..
*
असाच घडतो एकांती मग घाट मीलनाचा
राधा मोहन दृष्य जरी संयोग आत्म्यांचा…..
*
अतर्क्य बुद्धी करून समर्पण आतच परमात्म्याला
राधा कृष्ण, कृष्ण राधा भेट आकाराला……
*
कणात रस हा भरून उरतो प्रसाद पावित्र्याचा
कृतार्थ होता थेंब मिळे हा अमर अमृताचा…..
*
राधा नाही कुणीही मूर्ती ती केवळ शक्ती
भगवंताची जडली खरोखर स्वतः वरच प्रीती…..
*
देह नसती दोन हे असे एकच असती दोघे
वसुंधरेवर मीलन घडते कृष्ण पुढे राधा मागे….
*
शक्ति ही केवळ माझी अन्य नसे कोणी
अद्भुत प्रेम फुलते राधा मोहन रक्मिणी….
*
नको रुसू गं माय रुक्मिणी तू तर शक्ती माझी
जगात तू अन् आत वसते लपून राधा माझी…..
*
डोळे उघडून सत्य असे मग सहज सुलभ समोर
मीच माझी नित्य असे मग हीच खरी मोहर….
*
ही प्रेमाची खूण!!
भगवंत हृदयस्थ आहे 🙏
🌹🌹
© सुश्री अपर्णा परांजपे
कात्रज, पुणे
मो. 9503045495
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
Uttam kavita