☆ विविधा – ललित : ☕️ चहा ☕️ ☆ श्री अविनाश सगरे ☆
कसं मस्तमस्त वाटतंय सकाळीसकाळी वाफाळलेला चहा हातात पडल्यावर,म्हणजे कप हातात घेतल्यांवर!घराच्या बाल्कनीतून ओसरीतून गच्चीतून पार्किंग जागेतून हवं तर अंगणातून म्हणा नाही तर सोफ्यातून म्हणा ना! समोरचा दिसणारा हिरवागार निसर्ग,निळाशुभ्र तर कधी मेघांनी हा आक्रमिलेला नभ आसमंत! जगवणारी ऑक्सीजनची ही स्वच्छ हवा,आपण सोडलेला कार्बनडायऑक्साईडचा हा फवारा शोषून घेणारा तो लतावेलीं वृक्षराजींचा परिसर. हं सांगायचं म्हणजे अंगाखांद्यावर हवेहवेसेच असे वाटणारे खेळणारे सोनेरी सूर्यकिरणे आणि त्याचा तो प्रकाशझोत.
पाखरांचे मधुर सुगमसंगीत,त्यातच कोकिळेचा स्वरसाज. तन मन कसे प्रसन्न उत्तम उत्साही सळसळीत अन उभारी देवून जातं.या सर्वाबरोबरच वाफाळलेला चहा घेत असतां चहाची वाफ कशी गोलाई करत हळुवार वरवर जाते तसा उगवलेला दिवसही शांत शांत हळुवार जावा असे वाटते.
तो सर्व तयारीनिशी सज्ज आहे तुमच्यां भैरवी भूपाळीला, तुमच्या अणुरेणूंत उर्जा भरायला आणि धमन्यातलं रक्त सळसळावायला. आणि सूर्यास्तापर्यंतच्या कष्टाने व्याकूळ दमलेल्या मनाला शरीराला शांत समाधानी करत ती रात्र आहे तुम्हांला निद्रादेवीच्या आधीन करायला,सुखाच्या या आपल्यां झोपेसाठी मऊमुलायम चादरअंगावर ओढायला चहा निमित्तही आहे व हवासाही आहे दिवस आरंभाला!परंतु त्यांमूळे माणूस आत्मध्यानात न राहता विश्वाच्या या उदार उदात्त कृपाळू अभय अमोघ अथांग असिमितआणि बहुसहस्त्र पसारयांशी एकरुप होतो तद्रुप तादात्म्य पावतो अर्थात ते जाणले ओळखले मानले तर आणि तरच आहे!
पंचमहाभूतां देणगी मुक्तहस्ते। घे झोळी भरुन शुभकरांते.
© श्री अविनाश सगरे
मूळ हिंगणगांव सध्या जयसिंगपूर
सुस्वागतम् आणि अभिनंदन.
खुमासदार लेख.चहासारखच चटकदार.