सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ शांत झोप आनंदी मन… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
हे वाचूनच छान वाटते.काही जण म्हणतील की आनंदी मन असेल तर शांत झोप लागेल.आणि काहींचे म्हणणे असेल शांत झोप लागली तर मन आनंदी होईल.थोडक्यात या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत.
प्रथम आपण शांत झोप लागण्या साठी काय करायचे ते बघू.
यात काही भौतिक ( शारीरिक व्याधी व बाह्य ) व काही मानसिक कारणे असतात.
बाह्य कारणे आपणच निर्माण करतो. त्या साठी पुढील उपाय करावेत.
१) झोपण्या पूर्वी किमान ३ तास आधी जेवावे.
२) जेवल्यावर शतपावली करावी
३) झोपण्या पूर्वी २ तास टीव्ही,मोबाईल अशी साधने दूर ठेवावीत.
४) झोपण्या पूर्वी १ तास आधी एखादे पुस्तक वाचावे/नामस्मरण करावे/ मंद संगीत ऐकावे.
मानसिक कारणे
🔹 भूतकाळातील कटू आठवणी
🔹 आपल्या चुका
🔹 ईर्षा, राग, वाईट विचार, हतबलता, जबाबदाऱ्या
हे सगळे विचार झोपताना येतात आणि झोप येत नाही.
या साठी पुढील गोष्टी करता येतील.
शांत झोप येण्यासाठी हे करू शकतो.
१) सकाळी मेडिटेशन करणे.
२) दिवसात आवश्यक तेव्हा व्हाईट लाईट घेणे.
३) दीर्घ श्वसन करायचे.
झोपताना म्हणायचे, मी एक महान, पवित्र आत्मा आहे. मला शांत व गाढ झोप लागली आहे. या मुळे मनाला तशी आज्ञा मिळते.
४) असे डोळ्या समोर आणायचे, माझ्या हृदयातून शांती व प्रेमाची किरणे बाहेर पडून ती मेंदूत जात आहेत. आणि तिथे खूप शांती अनुभवत आहे.
हे केल्यामुळे
शांत झोप लागते
कमी वेळेत झोप पूर्ण होते.
सकाळी गजर न लावता जाग येते.
उत्साही व प्रसन्न वाटते.
♦️ या मुळे दिवसाची सुरवात प्रसन्न चित्ताने व आनंदाने होते.
या उपयामुळे जो आपला मूळ विषय आहे, शांत झोप आनंदी मन साध्य करू शकतो.
धन्यवाद!
© सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈