सौ.मंजुषा आफळे
विविधा
☆ सृजनानंद… ☆ सौ. मंजुषा आफळे ☆
प्रत्येक मनुष्य प्राण्यांमध्ये एक चित्रकार दडला आहे. परमेश्वराने बहाल केलेल्या आयुष्य रुपी कॅनव्हास वर तो आपले कर्तुत्व रेखाटतो. परिस्थितीनुसार त्याला जी शिकवण संस्कार शक्ती बुद्धी मिळते त्याचा तो ब्रश प्रमाणे वापर करतो. निसर्गतः त्याच्याकडे विविध रंग उपलब्ध आहेत. ते म्हणजे त्याचे सकारात्मक विचार,’ आचार आणि उच्चार. त्याने, फक्त सुंदर रंगांची योग्य निवड करून ते कल्पकतेने चित्रात भरायचे असतात. म्हणजे सृजनानंद निर्मिती तयार होते. पण स्वकर्तुत्वाने अशी कलाकृती निर्माण करताना त्याला प्रथम दुःख विरह संकटे यातना यातून पार पडावेच लागते. म्हणूनच सर्व रंग मिसळून तयार होणारी काळी चौकट चित्राला शोभून दिसते. चित्राला सुरक्षित ठेवते आणि चित्राचे सौंदर्य वाढवते.
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈