☆ विविधा ☆ सुख ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆
सुख कोणी पाहिले आहे का?
सुख म्हणजे नक्की काय, कोठे मिळते सुख?
सुखाच्या कल्पना आणि सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते.
मला बरेचदा हा प्रश्न पडतो की सुख म्हणजे नक्की काय? कोठे मिळते ? शांत पणे विचार केल्यावर लक्षात आले की सुख तर आपल्याला प्रतेक टप्प्यावर मिळते ते आपण कस स्वीकारतो हे आपल्यावर आहे.
प्रत्येकाच्या अपेक्षेप्रमाणे त्याचे स्वरूप बदलत जाते.काहीना खूप पैसा, अफाट संपती नोकर चाकर, भरपूर दागदागिने ऐशोआराम म्हणजे सुख. तर काही लोकांना आपल्या मनासारखे वागवून घेणे, आपली सत्ता गाजवणे, मी म्हणीन ते आणि तसच ह्यात सुख मिळते.
प्रतेक जण आपापल्या वया अनुसार सुख शोधत असतात.
तान्हं मूल आईच्या कुशीत. तर शाळकरी मुलं आपल्या मित्र मैत्रिणींच्या घोळक्यात.
काहींना प्रत्येक गोष्ट जींकण्याची नशा असते त्यांना त्यातच सुख मिळते. प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या कल्पना वेगळ्या वेगळ्या असतात. माझ्या मते,
श्रम केल्या नंतर गादी वर पडल्या पडल्या शांत झोप लागणे म्हणजे सुख.
गरम गरम वरण भात खाऊन दिलेली तृप्तीची ढेकर म्हणजे सुख.
रणरणत्या उन्हात अचानक मिळालेली झाडाची सावली म्हणजे सुख.
एखाद्या व्यक्तीला मदत केल्यानंतर त्याच्या चेहर्यावरचे समाधान म्हणजे सुख.
वेदनांचा दाह कमी होण्या साठी कोणी मायेने हात फिरवणे म्हणजे सुख.
आपल्या जोडीदाराने मी आहे, हो पुढे हे ऐकणे म्हणजे सुख.
लेकीने आई तू दमलीस, अस म्हणत गरम पोळी करून वाढणे म्हणजे सुख.
आजी आजोबांनी नातवंडांवर केलेली माया म्हणजे सुख.
बापरे किती गोष्टीतून आपल्याला सुख मिळत असते नाही का??
मग आपण सुख का शोधत फिरतो असाच आलेला मनात एक प्रश्न
सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️
© सौ. श्रेया सुनील दिवेकर
10.08 20202
मो 9423566278
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈