डाॅ. मंजूषा देशपांडे
Brief Introduction: M.Sc. Ph. D. (Women and Migration Studies), Director, Center for Community Development, Shivaji University, Kolhapur, Asiatic Research Fellow, (2019) (Forgotten Food: Impact of Migration and Urbanisation ), Research Associate(2007-2008) Overseas Development Institute, London, UK and sponsored by International Institute of Environment and Development
☆ विविधा : स्वर्णगौरी ☆ डॉ. मंजुषा देशपांडे
हा दक्षिण कर्नाटकातला मोठा सण! स्वर्णगौरी गणेश चतुर्थीच्या अगोदर एक दिवस म्हणजे आपल्या हरतालिकेच्या दिवशी येते. ही गौर म्हणजे श्रीगणेश यांची आई पार्वती.
ती गणपती बसण्याच्या आदल्या दिवशी येऊन घरात आपल्या मुलाला खाण्यासाठी पुरेसे धान्य, फराळाची व्यवस्था, फळफळावळ, दूध, दही, तूप, तिच्या मुलाला खेळण्यासाठी काही खेळण, त्याला बागडण्यासाठी शेतीवाडी, पुरेसे भरजरी कपडे, … अशी सगळी व्यवस्था पाहण्यासाठी ज्या घरात गणपती बसवणार आहेत त्या घरी येते. सगळी व्यवस्था पाहून ती जर खूश झाली तर स्वतः सुवर्ण गौरी असल्यामुळे ‘ सोन्यासारखे झळाळते आयुष्य मिळू दे’ असा आशीर्वाद देऊन गणेशाला त्या घरी पाठवते. या गौरीच्या दिवशी साडी, खण, सर्व प्रकारची धान्ये, डाळी, गूळ, साखर, तूप बांगड्या, एखादा दागिना, खेळणी, फळे, सुका मेवा, लाडू, करंज्या, चकल्या असे सर्व सूप भरून वाण द्यायची पध्दत आहे. यापैकी एक वाण सर्वार्थाने तृप्त स्त्री ला द्यायचे आणि उरलेली 15 वाणे ज्या घरी गणपती बसवण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद नसेल अशा घरी द्यायची पध्दत आहे.
या गोड पध्दतीचे अजून एक वैशिष्ट्य आहे. हे वाण देण्यासाठी त्या स्त्रीचे लग्न झाले आहे, तिला नवरा, मुले बाळे आहेत किंवा कसे असे कोणतेही बंधन नसते.
© डॉ. मंजुषा देशपांडे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुस्वागतम् आणि अभिनंदन.
खूप नवीन माहिती मिळाली.