विविधा
☆ स्वच्छ मनाने जग बघू या… ☆ सौ. सीमा राजोपाध्ये ☆
सकाळपासून मन थोडं अस्वस्थ आहे त्याचं कारण असं की सकाळी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली ..
कुरुंदवाडच्या अपंग चहा वाल्याची मुलगी वेटलिफ्टींग मध्ये मेक्सिको त देशाचं नेतृत्व करणार…
आता तुम्ही म्हणाल ..
ही इतक्या अभिमानाची गोष्ट आहे ..
आनंदाची गोष्ट आहे..
मग मला अस्वस्थ का वाटलं??तर त्याचं कारण असं की.. निश्चितच…..
इतक्या छोट्या गावातून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व एक मुलगी करते आणि तेही वेट लिफ्टिंग सारख्या प्रकारांमध्ये..
ही गोष्ट अभिमानाची आहे कौतुकाची आहे..
पण त्या बातमीचा मथळा होता ना..
तो मला अस्वस्थ करून गेला.. कुरुंदवाडच्या अपंग चहा वाल्या ची मुलगी…
ही अशी करूण किनार या बातमीला लावणे गरजेचे आहे का??
जे घडले ते अभिमानास्पद आहे .कौतुकास्पद आहे..
त्यामागे त्या मुलीचे कष्ट आहेत मेहनत आहे ..
त्याच बरोबर अपंग असून चहा विकत असून आपल्या अत्यंत गरीब अशा परिस्थितीतून मुलीला अशा प्रकारामध्ये तयार केलं गेलं… त्या वडिलांचं ही खूप कौतुक आहे त्यांच्या घरी आई मोलमजुरी करते आजीआजोबा भाजीपाला विकतात.
आर्थिक बळ कमीच ..
अशा परिस्थितीत देखील त्या कुटुंबानं आपल्या मुलीसाठी किंवा आपल्या मुलीच्या स्वप्नासाठी लागेल ते सर्व काही केल..
आणि समाजाला सार्थ अभिमान वाटावा असं त्या मुलींना काही करून दाखवलं..
हे खरोखरच आनंद… अभिमाना उत्साहाचं असताना अपंग चहा वाल्या ची मुलगी…
असा मथळा का???
जे चांगले आहे त्याचं कौतुक करा ना …त्या चांगल्या मधला कमी पणा दाखवण्यात कसला आलाय मोठेपणा…
ती व्यक्ती अपंग आहे.. चहा विकते.. गरीब आहे. यांत तिचा काय दोष???
तिच्या मनाचा मोठेपणा बघा ना…
आपल्या मुलीसाठी वाट्टेल ते करायची त्याची तयारी बघा ना.. हातीपायी नीटअसलेली.. श्रीमंत माणसं मुलांसाठी मोठी मोठी स्वप्न बघतात.. सर्व काही मुलांना पुरवत असतात..
पण सगळ्यांचीच मुलं काही अभिमानाची कामं करतात च असं नाही ना..
उलट आपण अपंग असताना देखील मान वर करून स्वाभिमानानं ते लोक जीवन जगत आहेत आणि काहीतरी वेगळं करूनही दाखवले आहे आयुष्यात..
हे कौतुकास्पद आहे .. त्याकडे लक्ष द्या ना…
मला काय वाटतं माहितीए का……
शारीरिक अपंगत्वापेक्षा मानसिक अपंग असलेल्या अशा व्यक्ती समाजासाठी घातक आहेत..
ज्याना कोणत्या गोष्टीतून कसा आणि कोणता संदेश या समाजाला द्यावा हे समजत नाही…
कोणी हाता पायानं अधू… कोणी डोळ्यांनं कमी..
मूक बधिर ..कर्ण बधिर.. असतात हो समाजात..
त् त्यांना आपला कमीपणा माहीत असतो..पण तो स्विकारून त्याच्या बरोबर च अशी माणसं ही चांगलं जीवन जगतात… कधी कधी काही वेगळे .. अभिमानास्पद करून दाखवतात…
पण ..
अशा प्रकारच्या बातम्या देताना..मुख्य गोष्ट महत्त्वाची न मानता आशा प्रकारे त्यांची करूण कहाणी च समाजासमोर आणणं..
अशा बातम्या आपल्या चॅनेलवर दाखवून टीआरपी वाढवणे..
खरं तर…
हे असे लोक मानसिक अपंग आहेत.. आणि १००% हे अयोग्य आहे..
वाजपेयी एका कवितेत म्हणतात
तन से हारा तो कुछ नही हारा…
पर..
मन से हारा वो सब कुछ हारा..
अगदी खरे आहे हे..
आपण सगळीच परमेश्वराची लेकरे..
कुणाला काही जास्त..
कोणाला काही कमी.
देतो परमेश्वर ..
कमी आहे ते स्वीकारून आपण चारचौघांसारखं नाही हे मान्य करून… जर खरोखरच काही आदर्श अशा लोकांनी घालून दिले असतील तर त्याचं कौतुक झालं पाहिजे ना..
तसे करत असताना देखील त्यांची दयनीयता.. त्यांची लाचारी जास्त ठळकपणे दाखवण्यात खरं मानसिक अपंगत्व आहे..
तर मुद्दा असा की..
जे चांगलं आहे..
कौतुकास्पद आहे ..
त्यापासून समाजाला प्रेरणा मिळू शकते..
काहीतरी नवं करून दाखवायची आवड निर्माण होऊ शकते अशा गोष्टींना प्राधान्य देऊया…
अशा गोष्टी सर्वांसमोर येऊ द्या.. चुकून एखादा छोटा मोठा दोष.. कमीपणा असेल ..
तर विशेष करून त्याच गोष्टीचं जास्त प्रदर्शन नको..
स्वच्छ मनाने जग बघू या..!!
© सौ.सीमा राजोपाध्ये..
8308684324
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈