विविधा
☆ हर पल यहाँ जी भर जियो … ☆ सौ. सीमा राजोपाध्ये ☆
हर पल यहाँ जी भर जियो …
खरंच…
जे क्षण मिळतात ते जसे मिळतात जसं आयुष्य मिळतं तसं खूप चांगलं चांगलं छान छान सकारात्मक आनंदी जगून घ्यावं माणसानं…..
कारण..
जो है समा कल हो ना हो…
हेच अंतिम सत्य…
आता एकदम असं वेगळ्याच प्रकारचं तत्त्वज्ञान मी का सांगते आहे ?..असा नक्कीच प्रश्न तुमच्या मनात आला असेल …
तर मंडळी ..
माझी जीवस्य मैत्रीण मागील वर्षी अनंताच्या प्रवासाला निघून गेली…
वय अवघं ४० वर्षांचं..
इतक्या लहान वयात असं तिचं न परतीच्या मार्गावर जाणं… वेदनादायक तर आहेच.. पण विचार करायला लावणारं देखील आहे..
तीचा च विचार चालू आहे खरं तर मनात…
वाटलं..
किती आणि काय काय राहिलं असेल मनात.. किती स्वप्न असतील.. स्वतःलाही आयुष्यात खूप काही करायचं राहून गेलं असेल ना तिचं…
असे सगळे विचार मनात गोफ धरत असताना पटकन असं वाटलं ..
हर पल यहा जी भर जियो..
जो है समा.. कल हो ना हो…
नेहमीच सगळे लेखक कवी आयुष्य क्षणभंगुर आहे .. असं म्हणतात..
येणं .. जाणं हे कधीच आपल्या हातात नाही…
हेआपल्याला माहिती असूनही आपण इतक्या दिमाखात … मीच आहे…
मी सगळं काही करू शकतो…
मुठ मारेन तिथे पाणी काढेन अशा अविर्भावात..
खरंच चालत असतो..
वेगवेगळ्या नको असलेल्या अनेक गोष्टी राग लोभ मस्तर … बाळगून असतो..
परमेश्वराने दिलेले हे सुंदर असं जीवन हे अशा सगळ्या गोष्टींनी मलिन करून जगायची काय आवश्यकता आहे..?
खरं तर..
माणूस म्हणजे हे सगळं आलंच मन आहे.. भावना आहे.. विचार आहेत.. नाती आहेत असे खूप गुंते आयुष्यात असतातच …
आणि खरं सांगू का..
एक वय ही असतं..
जे व्हा असतो ..
थोडा अविर्भाव ..
थोडा बेफिकीरपणा..
थोडा अहंकार ही…
तरी कुठेतरी एक कायम लक्षात असू द्यायचं की परमेश्वरानं दिलेलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्या परमेश्वराला आपल्याकडून चांगल्याचीच अपेक्षा आहे..
साने गुरुजी म्हणतात की..
झाडावर येणार फुल त्याचा जन्म किती लहान..
पण ते आपल्या अस्तित्वानं सगळ्या जगाला आनंद देतं… तर मग माणसाकडून परमेश्वरांनं किती अपेक्षा करावी ..
माणसं म्हणजे देवाच्या या नंदनवनातील फुले च आहेत..
म्हणून म्हणते..
आनंद द्या..
दिलखुलास पणे कौतुक करा.. फुकाचा हव्यास..
फुकाचा डामडोल..
फुकाचा मान्यस्थपणा..
फार काळ नाही टिकत..
म्हणूनच महाराजा…
जे वाटतं ना.. ते करून घ्यावं माणसानं…
खरंच..
मोगऱ्याचा सुगंध अनुभवावा.. कधी पावसात भिजण्याची मजा घ्यावी..
कधी शांत निरव रात्री आकाश तारकांनी भरलेलं असताना ते निहाळत बसावं…
नदीचं वहाणं…
समुद्राच्या आवेगात येणाऱ्या लाटा…
पक्ष्यांचा किलबिलाट…
सारं.. सारं मुक्तपणे कवेत घ्यावं कधीतरी..
निसर्ग जे भरभरून आपल्याला देतोय त्याची जाणीव ठेवावी त्याचे अनुभव घ्यावेत..
आपले विचार आपली वाणी आपला आचार नेहमी सौम्य सकारात्मक असू द्यावा
नात्यांचा गुंता हळुवार सोडवावा..
सुख.. दुःख.. आशा ..निराशा या हिंदोळ्यावर आयुष्य झुलत राहणारच हो..
निसर्गात सुध्दा रातकिड्यांची किरकिर नकोशी वाटते .. पण कोकीळेचं कूजन मोहून टाकतच ना… आणि सोनचाफ्याचा सुगंध..सोन्याचा नाही दिला .. परमेश्वराने …
म्हणून च जे आहे ते आनंदाने स्विकारणं योग्य….
आणि..
मन प्रसन्न असेल तर असं सगळं सहज निभावणं शक्य असतं .. आपण स्वतः बरोबर सभोवतालच्या वातावरण ही असंच प्रसन्न आनंदी ठेवू शकतो..
हीच तर त्या परमेश्वराची अपेक्षा आहे माणसाकडून..
खरंच असा विचार केला पाहिजे नक्की आपण…
कारण शेवटी…
पल पल बदल रही है
रूप जिंदगी..
धूप है कभी..
कभी हे छॉव जिंदगी..
हर पल यहॉ जी भर जियो..
जो है समा..
कल हो ना हो..
© सौ.सीमा राजोपाध्ये..
8308684324
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈