सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
विविधा
☆ दत्त म्हणजे देणारा… ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆
स्वत:च्याच ठायी असणारा आनंद चाखण्यासाठी निर्गुण निराकार परमेश्वर सगुण साकार झाला. आणि आपल्याला प्राप्त झाली. सर्व काही देणारा तोच म्हणून तो आहे दत्त.
विश्वरूपाने समोर, शरीर रूपाने जवळ व सच्चिदानंद रूपाने तो आपल्या अंत:करणात आहे.
शरिराच्या रुपाने साकार झाला, अवतिर्ण झाला. शरीर रुपाने आपण दिसतो पण मन व चैतन्य (ईश्वर) रुपाने आपण गुप्त आहोत. याचेच प्रतिक म्हणजे दत्त.
तीन शिरे :- शरीर + मन + चैतन्य (ईश्वर).
सहा हात :- शरीराचे दोन हात – डावा व उजवा
मनाचे दोन हात – बहिर्मन व अंतर्मन
चैतन्याचे दोन हात – जाणिव व नेणीव.
गाय म्हणजे अधिष्ठान असणारी चैतन्य शक्ती.
श्वान म्हणजे श्वास की ज्यामुळे जीवन आहे.
हातात त्रिशूळ म्हणजे हाताने काम, मुखाने नाम व अंतकरणात राम अशी जगण्याची जीवन शैली.
काखेत झोळी म्हणजे अहंकार सोडून जिथून ज्ञान मिळते तिथून सतत ज्ञान मिळवत रहा.
किंबहुना आपण (दत्त) जन्माला येतो तो ज्ञान मिळविण्यासाठी.
जो ज्ञान देतो तो गुरु आणि देतो तो देव.
सदगुरुने दिलेल्या ज्ञानाने आपणच दत्त म्हणजे देव होणे म्हणजेच गुरुदेव दत्त.
म्हणून खर्या अर्थाने असा दत्त आपल्या ठिकाणी जन्माला येणं म्हणजेच दत्तजयंती.
अशा दत्तजन्मौत्सवच्या मनःपूर्वक शुभेच्छा….
© शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈