सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “रिॲक्ट ॲन्ड रिसपाॅन्ड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
एकदा प्रवासात असतांना रेल्वेत एक कोल्ड्रिंक बाँटल आणि एक बिसलरी बाँटल घेण्याचा प्रसंग आला तेव्हा मला एकदम गौरगोपालदासजींचा “रिअँक्ट आँर रिस्पाँड” ह्या शिर्षकाची नेहमीप्रमाणेच माँरल असलेली व्हिडीओ क्लिप आठवली.
गौरगोपालदासजींच्या छोट्या छोट्या व्हिडीओ क्लिप्स मध्येही मोठ्ठ तत्वज्ञान दडलेलं असत. त्यांच्या क्लिपमध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी समजावून दिल्या आहेत. पहिलं उदाहरण त्यांनी क्रिकेट ह्या खेळामधील दिले.प्रतिस्पर्धी खेळाडू कित्येकदा आपल्याला उकसवायला वा आपला ताबा गमावण्यासाठी शिव्यांचा वा गैरशब्दांचा वापर करतात जर त्याला बळी न पडता आपण आपला ताबा याने की कंट्रोल स्वतःजवळच ठेवला तर क्रिकेटमधील स्थितप्रज्ञ खेळाडू सचिन तेंडूलकर सारखे आपण होऊच शकू.
ह्या क्लिप मधील मला सगळ्यात आवडलेलं उदाहरण म्हणजे कोल्ड्रिंक आणि साध्या पाण्याचं .हे बघून माझ्याही मनात काही विचार आलेत ते पुढीलप्रमाणे.
खरंच आयुष्य वा जीवन हे साध्या पाण्यासारखं शांत,निर्मळ, समाधान देणारं तसंच स्थिर, खळखळाट नसलेलं,एका स्थितप्रज्ञासारखं असावं वा आपण घालवावं न की कोल्ड्रिंक्स सारख फसफसून वर उचंबळणार,खळखळाट असणारं,आतड्यांना इजा पोहोचवणारं आणि कधीच तृप्तता न देणार.
ह्या बाबतीत मला अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आपलं वागणं हे कायम आपल्या हातात असतं पण दुसऱ्याचे वागणे आपल्या हातात अजिबात नसतं त्यामुळे आपण आपल्या जागी शांतपणे वागलं तर मग कुठल्याही अडचणींचा सामना आपण योग्य त-हेने करु शकतो.
थोडक्यात काय तर गौरगोपालदासजींच्या ह्या क्लिप मधून इतकं मात्र शिकले माणसाने कोल्ड्रिंक्स सारख न जगता पाण्यासारखं जगलं तर आयुष्य नक्कीच समाधानात, शांत व्यतीत होतं.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈